Punishment : विनयभंग करणाऱ्या शिक्षकास सक्तमजुरी

Punishment

कोल्हापूर : प्रतिनिधी : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षक महेश नारायण नाजरे (वय ५८) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती पी.एफ. सय्यद यांनी तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. सरकारी वकील म्हणून मंजुषा पाटील यांनी काम पाहिले. (Punishment)

या खटल्याची माहिती अशी की महेश नाजरे हे पत्नी, मुलगा, सून, नातवंडे यांच्यासह कोल्हापूरातील उपनगरात रहात आहेत. त्याच्या घराजवळ दहावी इयत्तेत शिकणारी पिडीत मुलगी रहात होती. नऊ फेब्रुवारी २०१९ रोजी पिडित मुलीकडे शिक्षक महेश नाजरे याने इतिहासाच्या पुस्तकाची मागणी केली. पिडीत मुलीने  इतिहासाचे पुस्तक नाजरे याला आणून दिले. त्यानंतर नाजरे याने  स्वत:च्या मुलीला पुस्तकाची झेरॉक्स प्रत काढण्यास पाठवले. तसेच झेरॉक्स प्रत पिडित मुलीला घरी आणून देण्याचा निरोप त्याने स्वत:च्या मुलीला दिला.  त्यानंतर पिडीत मुलगी पुस्तकाची झेरॉक्स घरी घेऊन आली तेव्हा शिक्षक नाजरे मोबाईलवर घाणेरडे व्हिडिओ पहात होता. त्यावेळी घरी कोणी नव्हते. शिक्षक नाजरे याने मोबाईल बंद करुन पिडीत मुलीच्या अंगाला स्पर्श करुन लज्जा येईल, असे वर्तन केले. त्यानंतर मुलीच्या हाताला धरुन बेडरुमकडे घेऊन जात असताना तिने हाताला हिसडा मारुन घराकडे पळाली. हिसडा मारताना मुलीच्या हाताच्या मनगटाला शिक्षक नाजरे याची नखे लागल्याने दुखापत झाली. (Punishment)

नाजरे यांच्यासोबत घडलेला प्रसंग मुलीने आईला सांगितला. पिडित मुलीच्या आईने शिक्षक नाजरे याच्या घरी जाऊन जाब विचारला. तसेच तिने पतीलाही बोलावून घेतले. पिडित मुलीच्या आईवडीलांची शिक्षक नाजरे यानी माफी मागितली.  ‘एक वेळ चूक झाली. माफ करा. हे प्रकरण वाढवू नका, इथलेच प्रकरण मिटवा’ अशी गयावया करु लागला. (Punishment)

मुलीच्या आयुष्याचा विचार करुन जर गप्प बसलो तरी शिक्षक नाजरे याच्याकडून पुन्हा गंभीर घटना घडण्याचा धोका लक्षात घेऊन पिडिताच्या वडिलांनी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. करवीर पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी शिक्षक नाजरेला अटक केली.  करवीर पोलिस ठाण्यातील तत्कालिन सहाय्यक पोलिस निरीक्षक अरविंद कांबळे यांनी तपास करुन कोर्टात आरोपपत्र दाखल केले. (Punishment)

जिल्हा सत्र न्यायाधीश सय्यद यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकारी वकील मंजुषा पाटील यांनी नऊ साक्षीदार तपासले. पिडिता, तिचे आई वडिल, भांडण पाहणारे शेजारी. झेरॉक्स दुकानाचा मालक, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय गाडवे यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. सरकारी वकील मंजुषा पाटील यांचा युक्तीवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी शिक्षक महेश नाजरे याला पोक्सो कायदा कलम ८ नुसार तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंडा, कलम १२ नुसार एक वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला.  (Punishment)

हेही वाचा :

कोल्हापुरात प्रायोगिक तत्त्वावर ‘स्वस्थ जन्म अभियान’

Related posts

मंत्रीपदाच्या बोलीवर बच्चू कडूच्या हाती धनुष्यबाण!

काँग्रेसची माघार; विधान परिषद निवडणूक बिनविरोध  

गोकुळ संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यास उच्च न्यायालयाचा नकार