Prithviraj Chavan slams : सर्वपक्षीय शिष्टमंडळाबाबत संसदीय परंपरेचा भंग

Prithviraj Chavan

मुंबई : विशेष प्रतिनिधी : पहेलगामनंतरच्या परिस्थितीवर भारताची भूमिका जगासमोर मांडण्याची भूमिका योग्य असली तरी सर्वपक्षीय शिष्टमंडळ नेमण्याची संसदीय परंपरा आहे. हे शिष्टमंडळ संसदीय असले पाहिजे, मात्र त्या परंपरेचा भंग मोदी सरकारने केला आहे, असा आरोप काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी (१९ मे) केला. (Prithviraj Chavan slams)

काँग्रेस प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर आणि अलीकडील निर्णयांवर अनेक प्रश्न उपस्थित केले. वन नेशन-वन इलेक्शनपासून ईव्हीएम, सर्वपक्षीय शिष्टमंडळ, आशिया कप, पाकिस्तानशी संबंधित जलविवाद अशा सर्व मुद्द्यांवर भूमिका मांडली.

ते  म्हणाले कि, देशाने युद्धकाळातही पारदर्शिकता राखली आहे. १९६५ मध्ये नेहरू, १९७१ मध्ये इंदिरा गांधी आणि कारगिल युद्धावेळी अटलबिहारी वाजपेयी संसदेला नियमित माहिती देत असत. आज पंतप्रधान ना जनतेसमोर येतात, ना प्रेस कॉन्फरन्स घेतात, ना संसदेचे अधिवेशन बोलवतात. (Prithviraj Chavan slams)

भारत सरकारचे पीओके संदर्भात स्पष्ट धोरण असले पाहिजे, पण ते दिसत नाही. असे सांगून ते  म्हणाले कि, ‘वन नेशन-वन इलेक्शन’चा फायदा दाखवला जात असला तरी, पण संसदीय पद्धतीत कधीही लोकसभा किंवा विधानसभा भंग होऊ शकते. ‘मी स्वतः १९९६, १९९८आणि १९९९ मध्ये तीन वर्षांत तीनदा लोकसभा निवडणुका लढल्या आहेत. याचा अर्थ लोकसभा कोणत्याही वेळी भंग होऊ शकते. त्यानंतर उपलब्ध कार्यकाळासाठी वेगळ्या निवडणुका घ्याव्या लागतील.

ते म्हणाले कि, केंद्र सरकार अमेरिका प्रणालीसारखी निवडणूक प्रक्रिया भारतात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. काँग्रेसचा याला पूर्ण विरोध आहे. ईव्हीएमवर पूर्णपणे बंदी आणली पाहिजे. जगभर ईव्हीएमला विरोध होत आहे, परंतु केंद्र सरकार अद्यापही इव्हीएम हटविण्याची भूमिका घेत नाही. (Prithviraj Chavan slams)

विजय शहांमध्ये मोदींना व्होट बँक दिसते मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहा यांच्याबाबत बोलताना चव्हाण म्हणाले कि, मोदींनी मनात आणले तर एका तासात विजय शहांचे मंत्रिपद काढून घेऊ शकतात, पण त्यांना त्यांच्या मंत्र्यांमध्ये आदिवासी वोट बँक दिसते. शहा यांनी ऑपेरेशन सिंदूरमधील भारतीय सेनेच्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत अत्यंत चुकीची प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले असतानाही या मंत्र्याला पाठीशी घातले जात आहे, हे अत्यंत निंदनीय आहे.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर