Online service : १५ ऑगस्टपर्यंत सर्व सेवा ऑनलाईन करा

Online service

मुंबई : प्रतिनिधी  : शासनाच्या सर्व सेवा १५ ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन करा. जो विभाग त्यांच्या सेवा १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करणार नाहीत त्या विभागाला दर दिवशी प्रत्येक सेवेकरिता एक हजार रुपयांचा दंड  आकारला जाईल. शासनाकडून कोणत्या सेवा नागरिकांना दिल्या जातात याची शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना या विषयाबाबत माहिती व्हावी यासाठी या अधिनियमाचा अभ्यासात समावेश करण्यासाठी कार्यवाही करावी , अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी केल्या. (Online service)

                 सह्याद्री अतिथीगृह येथे सामान्य प्रशासन विभाग व महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या अंमलबजावणीची “दशकपूर्ती” आणि “प्रथम सेवा हक्क दिन” निमित्त राज्यस्तरीय  सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव, ब्रँड अँबेसिडर पद्मश्री शंकर महादेवन, सोनाली कुलकर्णी, माजी राज्य सेवा हक्क मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रीय, राज्य सेवा हक्क कोकणचे आयुक्त बलदेव सिंह, पुणेचे राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त दिलीप शिंदे यासह प्रशासनातील ज्येष्ठ  वरिष्ठ सनदी अधिकारी यावेळी उपस्थित होते. (Online service)

          मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत सध्या हजार पेक्षा जास्त सेवा या कायद्याच्या अंतर्गत अधिसूचित केल्या  आहेत. जवळपास ५८३ सेवा ऑनलाइन दिलेल्या आहेत. अजून ३०० सेवा या ऑनलाइन  आणायच्या आहेत तर  १२५ सेवा ऑनलाइन आहेत पण त्या कॉमन पोर्टलवर उपलब्ध नाहीत आणि म्हणून शासनाच्या सर्व विभागांनी  १५ ऑगस्ट पर्यंत सर्व सेवा ऑनलाईन कराव्यात. (Online service)

 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,  जिथे समाजाला त्यांचे सर्व हक्क आणि अधिकार त्यांना सेवा दिल्या जातात तिथे प्रगती अटळ असते.हा कायदा  प्रशासन व नागरिकांमधला विश्वासाचा एक पूल आहे.  सर्वसामान्य जनतेच्या सक्षमीकरणाचा  हा पाया अधिक मजबूत होईल आणि या अधिनियमच्या माध्यमातून लोकांना तात्काळ सेवा मिळतील. (Online service)

 यावेळी वर्ध्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा सेवादूत प्रकल्पाची सुरुवात केल्याबद्दल,यवतमाळचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी अभिप्राय कक्ष सुरू केल्याबद्दल कोल्हापूर चे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव यांनी आयोगाची गेल्या दहा वर्षातील वाटचालीचा आढावा घेतला.या कायद्याच्या जनजागृतीसाटी आयोग नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणार असून भविष्यात आयोगाने हाती घेतलेल्या उपक्रमांची माहिती यावेळी दिली. पुणेचे राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त दिलीप शिंदे यांनी आभार मानले. (Online service)

हेही वाचा :

एसटी महामंडळाची आर्थिक श्वेतपत्रिका काढा

मुंबई रेल्वेस्थानकांवर कडक सुरक्षा यंत्रणा

ओवेसींचा पाकिस्तानला इशारा

भारतात पाच लाखाहून अधिक पाकिस्तानी महिला

Related posts

शरद पवार दिल्लीत कशासाठी हवेत?

संकटाच्या गर्तेतून राष्ट्रवादी काँग्रेस कशी मार्ग काढणार?

Jaysingrao Pawar मराठ्यांचा इतिहास लखलखीत करणारे संशोधक