Pralhad Chavan : प्रल्हाद चव्हाण यांची निष्ठा आदर्शवत : खासदार शाहू छत्रपती

Pralhad Chavan

कोल्हापूर : प्रतिनिधी : माजी महापौर प्रल्हाद चव्हाण यांनी आयुष्यभर जी निष्ठा दाखविली, ती समाजाला प्रेरणादायी आणि आदर्शवत आहे, असे गौरवौद्गार खासदार शाहू महाराज यांनी काढले. (Pralhad Chavan)

माजी महापौर प्रल्हाद चव्हाण यांच्या व्दितीय स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी खासदार शाहू महाराज बोलत होते. प्रल्हाद चव्हाण यांच्या जीवनचरित्रावर पत्रकार गुरुबाळ माळी यांनी लिहिलेल्या ‘निष्ठावंत’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील प्रमुख पाहुणे होते. ऑल इंडिया टेंट डकोरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष दडू पुरोहित हे उपस्थित होते. यावेळी महंमद शेरीफ शेख व शकुंतला कांबळे यांना निष्ठावान कार्यकर्ता पुरस्कार तर  शहाजी चव्हाण, पांडूरंग करपे व शंकर माळी यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (Pralhad Chavan)

खासदार शाहू महाराज म्ह्णाले, चव्हाण यांनी आयुष्यभर काँग्रेसवर पक्षावर निष्ठा ठेवली. व्यवसाय करताना सामाजिक बांधिलकी जपली. त्यांना आमदार व्हायचे होते. पण, आयुष्यभर फुटबॉल खेळाप्रमाणे त्यांना गोल करण्याऐवजी पास देण्याची वेळ आली. त्यांनी चांगले पास दिल्याने अनेकांनी आमदारकीचा गोल केला.  

आमदार सतेज पाटील म्हणाले,  प्रल्हाद चव्हाण यांचे कार्य आणि निष्ठा हे आदर्शवत आहे. स्वार्थी राजकारणाच्या युगात एकनिष्ठ कसे रहावे हे प्रल्हाद चव्हाण यांच्याकडून शिकायला हवे. त्यांचा वारसा त्यांचे सुपुत्र सागर चव्हाण व सचिन चव्हाण हे जपत आहेत, हे कौतुकास्पद आहे. (Pralhad Chavan)

माजी उपमहापौर विक्रम जरग यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी उपमहापौर भूपाल शेटे, दडू पुरोहित, प्रफुल्ल जोशी, वसंत लिंगनूरकर, महमंद शेरीफ शेख यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास माजी महापौर महादेवराव आडगुळे,  आर.के. पोवार, , मारूतराव कातवरे, सागर चव्हाण, माजी उपमहापौर संजय मोहिते, बी.के. डोंगळे, ऑल महाराष्ट्र टेंट, डकोरेटर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष राहूल मनोत, पश्चिम महाराष्ट्र विभागाचे चेअरमन सुनील माळी, मावळचे राज्य प्रतिनिधी नितीन गवळी, सातारा राज्य प्रतिनिधी गोरखनाथ करपे, सुर्यकांत पाटील बुद्धीहाळकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुजित चव्हाण, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, सरलाताई पाटील, आदी उपस्थित होते.  शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी आभार मानले. (Pralhad Chavan)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर