Prajwal Bhojane : कळंबा गॅस स्फोटात तिसरा मृत्यू, कुटुंब उधवस्त  

Prajwal Bhojane

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर शहराजवळील कळंबा येथे पाइपलाइनमधून  गॅस गळती होऊन झालेल्या  स्फोटात गंभीर जखमी असलेल्या सहा वर्षाच्या प्रज्वल अमर भोजने या मुलाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेत यापूर्वी भोजने कुटुंबातील आजोबा आणि सुनेचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतील मृतांची संख्या तीन इतकी झाली आहे. गॅस पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या हलगर्जी झाल्याने भोजणे कुटुंब उधवस्त झाले आहे. दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू झाले आहे. (Prajwal Bhojane)

कळंबा गॅस स्फोटात जखमी झालेला सहा वर्षांचा  प्रज्वल अमर भोजणे हा  गेल्या पंधरा दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होता. सीपीआर हॉस्पिटनंतर तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.  शरीराच्या अंतर्गत भागाला गंभीर इजा झाल्याने बुधवारी दुपारी (दि.१०) तिचा मृत्यू झाला.

 कळंबा येथील मनोरमा कॉलनीत राहणाऱ्या भोजणे कुटुंबात गणपती आगमनाची तयारी सुरू होती. घरातील स्वच्छता, रंगरंगोटी सुरू असतानाच २५ ऑगस्ट रोजी घरी जोडलेल्या पाईप गॅस पाईप लिकेज होऊन घरात गॅस गळती झाली. यामध्ये सासरा, सून, नातू असे तिघेजण भाजून गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेत सून शितल अमर भोसले (वय २९) यांचा दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला. (Prajwal Bhojane)

    त्यानंतर सीपीआर रुग्णालयात उपचार घेणारे अनंत भोजने (वय ६०) यांचा चार ते पाच दिवसांनी मृत्यू झाला. तर प्रज्वल अमर भोजने (वय ०६) हा प्रारंभी सीपीआर व त्यानंतर खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.  प्रज्वलला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र उपचाराला प्रकृती साथ देत नसल्याने बुधवारी त्याची धडपड थांबली.

 वडील, पत्नी, मुलगा अशा तिघांच्या मृत्यूंमुळे अमर अनंत भोजने यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गॅस जोडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या एका चुकीमुळे भोजने कुटुंबातील तीन सदस्यांना जीव गमवावा लागला. संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे. गॅस दुर्घटनेतील फॉरेन्सिक तज्ज्ञांचा तपासणी अहवाल  जुना राजवाडा पोलीसांना प्राप्त झाला आहे. त्यामध्ये गॅस पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आल्याचे समजते.  पोलीस या अहवालाचा अभ्यास करीत आहेत. (Prajwal Bhojane)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर