Delhi struck by heavy rain: दिल्लीत मुसळधार पावसाचे चार बळी

Delhi struck by heavy rain

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीला शुक्रवारी मुसळधार पावसामुळे झोडपले. अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. घरांमध्ये पाणी घुसले आहे. जोरदार वारे आणि तुफान पावसामुळे घर कोसळून चार जणांचा मृत्यू झाला. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे काही काळ इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाणे थांबवावी लागली. अनेक रस्ते तुंबले आहेत. त्यामुळे अग्निशमन यंत्रणा, पोलिस आणि स्थानिक प्रशासनाची धावपळ उडाली आहे. हवामान विभागाने मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.(Delhi struck by heavy rain)

शुक्रवारी (२ मे) पहाटे दिल्ली-एनसीआरमध्ये जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरू झाला. मोठ्या प्रमाणात पाणी साचले, झाडे उन्मळून पडली, वीजवाहिन्या तुटल्या. वाहतूक आणि विमान वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. मुसळधार पावसामुळे नजफगढमध्ये घर कोसळले. या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला. (Delhi struck by heavy rain)

पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे विमानतळावरील उड्डाणे विस्कळीत झाली. आयएमडीने रेड अलर्ट जारी केला आहे. आणखी पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हिमाचल आणि उत्तर प्रदेशसह उत्तर भारतातील राज्यांमध्ये वादळ आणि संभाव्य बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी पूरग्रस्त भागांचा आढावा घेतल्यानंतर मजनू का टिल्ला येथे भेट दिली. त्यांच्या पाहणीदरम्यान माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, ‘‘दिल्लीतील अनेक भागांत पाणी साचले आहे. काही ठिकाणी गटारे नाहीत; तर काही ठिकाणी गटारे तुंबली आहेत, रस्ते खराब झाले आहेत. दिल्लीची स्थिती खूपच वाईट आहे. त्यात तातडीने सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. ही भयंकर चिंताजनक परिस्थिती आहे. सर्व यंत्रणांनी आजच्या पावसानंतर जी परिस्थिती निर्माण झाली आहे तो भविष्यातील इशारा म्हणून गांभीर्याने लक्षात घेतला पाहिजे. त्यावर कारवाई केली पाहिजे. पाणी साचण्याची शक्यता असलेल्या भागात लक्ष घालण्यास सुरुवात केली पाहिजे. आम्ही सर्व संबंधितांना तातडीने कारवाई करण्याची सूचना दिली आहे.’’ (Delhi struck by heavy rain)

 मुख्यमंत्री गुप्ता यांनी दिल्लीच्या या परिस्थितीला आधीच्या सरकारला दोषी धरले. आज हजारो दिल्लीवासी वाहतूक कोंडीत अडकले आहेत. सरकार या समस्या सोडवण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. अधिकारी रस्त्यांवर काम करत आहेत. या सर्व व्यवस्था वेळेवर दुरुस्त करणे ही आपली जबाबदारी आहे, असे गुप्ता यांनी म्हटले आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री आतीशी यांनी पावसानंतर निर्माण झाल्यानंतर तुंबलेल्या पाण्यातून वाट काढणाऱ्या वाहनांचो व्हिडीओ शेअर करत दिल्ली सरकारवर टीका केली आहे. दिल्लीतील लोकांना ४ इंजिन असलेल्या भाजप सरकारकडून हीच अपेक्षा होती का?, असा सवालही त्यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये केला आहे.

हेही वाचा :
देश संतापात, पंतप्रधान मनोरंजनात
जातगणनेची कालमर्यादा स्पष्ट करा

Related posts

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर

डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या स्थानी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर