श्रीराम साळुंखे यांना पीएच. डी. प्रदान

Ph.D. Conferred upon Shriram Salunkhe

कोल्हापूर : येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विद्यासमितीचे अध्यक्ष, आजीव सेवक श्रीराम साळुंखे यांना ‘कोल्हापूर संस्थांनातील जलव्यवस्थापन’ या विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांची इतिहास विषयातील पीएच. डी. पदवी प्रा. डॉ. नानासाहेब मनाळे (ढोकी) यांच्या मार्गदर्शनाखाली प्राप्त झाली. या संशोधनात त्यांनी कोल्हापूर संस्थांनातील शाहू पूर्वकालीन, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळातील केलेल्या जलव्यवस्थापनाचे ऐतिहासिक संशोधन केले आहे. (Ph.D. Conferred upon Shriram Salunkhe)

या संशोधनासाठी त्यांना कै. डॉ. शरदचंद्र साळुंखे, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, प्राचार्य सौ. शुभांगी गावडे, प्रा. सौ. गीतांजली साळुंखे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले. या संशोधन काळात धाराशिव येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांचे सहकार्य लाभले. (Ph.D. Conferred upon Shriram Salunkhe)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर