अवघ्या दहा महिन्याची मुलगी. अपघातात ती ब्रेनडेड झाली. तिच्या पालकांनी तिचा अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. तिच्या कुटुंबाने घेतलेल्या निर्णयामुळे चारजणांना जीवदान मिळाले आहे. अलिन शेरीन असं त्या चिमुकलेचे नाव आहे. अलिन शरीन यांच्या पालकांनी जड अंतकरणाने अवयवदान करण्याचा निर्णय घेऊन समाजापुढे एक मोठा आदर्श ठेवला आहे.
पाच फेब्रुवारी केरळमधील कोट्टायमजवळील पल्लम येथे झालेल्या रस्ते अपघातात दहा महिन्याची अलिन गंभीर जखमी झाली. तिला कोची येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले. तिचा मेंदू निकामी झाला होता. ती ब्रेनडेड झाल्याने तिचे अवयवदान करण्याचा निर्णय तिच्या पालकांनी जड अंतकरणांनी घेतला. त्यानंतर तिचे मुत्रपिंड, हृदय, यकृत आणि कॉर्निया दान करण्यात आला. जगाचा निरोप देताना अलिनच्या अवयवदानामुळे चार मुलांना जीवदान मिळाले आहे. (Organ donation of a 10-month-old girl)
दहा महिन्याच्या सर्वात तरुण अवयवदाता ठरलेल्या अलिनच्या पार्थिवावर रविवारी भावनिक वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मल्लप्पली येथील एका खासगी हॉस्पिटलमधील शवागृहात ठेवण्यात आलेले पार्थिव पश्चिम वालुमन्नील येथील तिच्या घरी आणले. तिचे अंत्यदर्शन घेण्यासाठी लांबून लोक मोठ्या संख्येने आले होते. केंद्रीय मंत्री सुरेश गोपी, आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज श्री वासवन, मत्स्यव्यवसाय मंत्री साजी चेरियन, जलसंपदा मंत्री रोशी ऑगस्टिन आणि पठाणमथिट्टाचे जिल्हाधिकारी एस.प्रेम कृष्ण यांनी श्रद्धाजंली वाहिली. (Organ donation of a 10-month-old girl)
रविवारी अलिनचे पार्थिव जेव्हा तिच्या घरी आणण्यात आले तेव्हा कोट्टायममध्ये एक उदास वातावरण होते. तिच्या मुलीला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आले तेव्हा तिचे वडील अरुण अब्राहम आणि शेरीन जॉन यांना आपल्या भावना लपवता आल्या नाहीत. त्यांनी आश्रूंना मोकळी वाट करुन दिली. त्यानंतर तिचे पार्थिव अंतिमसंस्कारासाठी नेंदुगडापल्ली सेंट थॉमस सीएसआयच चर्च स्मशानभूमीन नेण्यात आले. तिच्यावर पूर्ण राजकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. अलिनला श्रद्धाजंली वाहताना केरळचे सहकार मंत्री व्ही.एन. वासवन म्हणाले, अलिनच्या कुटुंबाने वैश्विक मानवतेचे एक उदात्त उदाहरण समाजापुढे ठेवले आहे. (Organ donation of a 10-month-old girl)