Opposition’s protest:  शक्तिपीठ रद्द करा; विरोधकांचे आंदोलन

Opposition’s protest

मुंबई : विशेष प्रतिनिधी : पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरवातही गोंधळ आणि आंदोलनाने झाली. शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक ठरणारा शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा, अशी मागणी करत विधिमंडळाचा परिसर विरोधकांनी दणाणून सोडला. (Opposition’s protest)

मंगळवारी (१ जुलै) महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.

‘एकाच जिद्द, शक्तिपीठ रद्द,’ ‘शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारचा धिक्कार असो,’ अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. (Opposition’s protest)

तत्पूर्वी महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मुंबई येथील विधान भवन परिसरातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. राज्याला अन्नधान्यात स्वयंभू बनणाऱ्या या लोकनेत्याच्या स्मृतींना यावेळी उजाळा दिला.  याप्रसंगी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विजय वड्डेटीवार, सतेज पाटील, जितेंद्र आव्हाड, ज्योती गायकवाड आदी उपस्थित होते.

हेही वाचा :
सहा दशके घरात काँग्रेस… तरीही भाजपमध्ये प्रवेश
बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ : मुख्यमंत्री

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर