‘महाराष्ट्राचा अपमान केल्याबद्दलच कोश्यारीचा भाजपाकडून सन्मान’; विरोधकांची  टीका

Opposition criticizes Koshyari over Padma Vibhushan awards

जमीर काझी : मुंबई :  महाराष्ट्राचे वादग्रस्त माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केंद्र सरकारने पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्याने राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. विरोधी पक्षाने यावरून केंद्र सरकार व भाजपावर निशाणा साधला असून आमचे महापुरुष व महाराष्ट्राचा अपमान केल्याबद्दल त्यांचा भाजपाने सन्मान केला आहे, असा हल्लाबोल केला आहे. (Opposition criticizes Koshyari over Padma Vibhushan awards)

 महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून कार्यरत असताना कोश्यारी यांनी विविध प्रसंगावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यात मोठा असंतोष निर्माण झाला होता. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या बालविवाहावर अवमानकारक टिप्पणी केली होती, ज्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली होती. त्यामुळे त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. त्यामुळे केंद्र सरकारने रविवारी त्यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केल्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी ट्विट करून सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की,’ या महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला होता. महाराष्ट्राचा अपमान करणऱ्यांचा भाजपा सन्मान करते! छान!’ अशी टीका केली आहे. 

  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कोश्यारींना पद्मभूषण देण्यात आल्यानंतर हल्लाबोल केला आहे. संविधानाची पायमल्ली करणाऱ्या व्यक्तीला पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. संविधान पदाचा त्यांनी अपमान केला आहे. शिव शाहू फुलेंचा अपमान करणाऱ्याला हा पुरस्कार देण्यात आला असून कोश्यारी हा विकृत माणूस असल्याचा त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (Opposition criticizes Koshyari over Padma Vibhushan awards)

 मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना प्रत्युत्तर 

भगतसिंह कोश्यारी हे समर्पित जीवन जगलेले आहेत. ⁠देशाच्या प्रगतीकडे त्यांचे काम आहे. ⁠वन रॅक वन पेन्शन सैनिकांच्या पेन्शनचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला. ⁠मात्र काही छोट्या मनाचे लोकं एक प्रकारे विवाद उभा करतात. ⁠आता काहींच्या काळात कोणाला काय काय देण्यात आले, त्या वादात मी पडत नाही. नाहीतर दिवस पुरणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. (Opposition criticizes Koshyari over Padma Vibhushan awards)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर