व्हिक्टर ॲम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांना वैद्यकीय क्षेत्रासाठीचे नोबेल जाहीर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना वैद्यकीय क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल यंदाचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. पुरस्कारांची घोषणा आज (दि. ७) करण्यात आली. मायक्रो आरएनएच्या (microRNA) शोधाबद्दल व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले.

जनुकांच्या क्रियाकलापांचे नियमन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मायक्रोआरएनए या सूक्ष्म रेणूच्या शोधाबद्दल या दोघांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे निवड समितीने म्हटले आहे. आपल्या शरीरातील सर्व पेशींची जनुके सारखीच असली तरी, स्नायू आणि चेतापेशी यांसारख्या विविध प्रकारच्या पेशींची कार्ये वेगवेगळी असतात, असे या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. अर्थशास्त्र, साहित्य, शांतता, विज्ञान अशा क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींसाठी नोबेल पुरस्कार देण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही वैद्यकीय क्षेत्रासाठी पहिल्यांदा पुरस्काराची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता यापुढे १४ ऑक्टोबरपर्यंत अन्य क्षेत्रांतील पुरस्कारांची घोषणा करण्यात येईल.

हेही वाचा :

Related posts

चंद्रकांतदादा, मुश्रीफांचे सहकार कायदा बदलण्याचे षढयंत्र ; सतेज पाटील यांचा आरोप

गोकुळ निवडणुकीत माजी आमदार सत्यजित पाटील सतेज पाटलांसोबत

एसआयआरअंतर्गत  राज्यातील मतदार यादीतून २ कोटी ६ लाख नावे वगळली