Nitesh Rane’s jibe : ‘आदित्य ठाकरे बुरखा घालतील…’ : नितेश राणेंची टीका

Nitesh Rane's jibe

मुंबई : महाराष्ट्राचे मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांनी युवा सेनेचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. आशिया कप २०२५ मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला विरोध केल्याबद्दल आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना राणे यांनी ते (आदित्य ठाकरे) ‘बुरखा घालून’ सामना पाहतील असे म्हणाले. (Nitesh Rane’s jibe)

‘‘आदित्य ठाकरे बुरखा घालून भारत-पाकिस्तान सामना गुपचूप पाहतील…’’ अशा शब्दांत राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्या टीकेचा समाचार घेतला.

पहेलगामनंतरच्या घटनेवरून दोन्ही देशांदरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी आशिया कप २०२५ मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर टीका केली होती. त्याला राणे यांनी प्रत्युत्तर दिले. (Nitesh Rane’s jibe)

पहेलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करताना ठाकरे यांनी, ‘‘रक्त आणि क्रिकेट एकत्र वाहू शकतात का’’ असा सवाल केला होता. (Nitesh Rane’s jibe)

‘राष्ट्रीय भावनांचा अपमान’

एआयएमआयएम आणि शिवसेना (उबाठा) यांसह अनेक विरोधी पक्षांनीही या सामन्यावरून भाजप आणि बीसीसीआयवर टीका केली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही हा सामना राष्ट्रीय भावनांचा आणि कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या सैनिकांचा अपमान असल्याचे म्हटले. ‘‘हा क्रिकेट सामना राष्ट्रीय भावनांचा अपमान आहे. आपले सैनिक सीमेवर आपले प्राण अर्पण करत असताना आपण पाकिस्तानशी क्रिकेट खेळावे का?’’ असा सवाल ठाकरे यांनी केला होता.

Related posts

फडणवीसांचे चॅलेंज सुप्रिया सुळे, प्रणिती शिंदेंनी स्वीकारले

महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक नामंजूर

सरकारने एफआयआर घ्यायला का नकार दिला?;  सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांना  सवाल