नवी दिल्ली : भारतात पाच लाख पाकिस्तानी महिला राहत आहेत, असा दावा भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केला आहे. ‘पाकिस्तानी दहशतवादाचा नवा चेहरा’ असे त्यांनी वर्णन केले आहे. एकीकडे कायदेशीरित्या भारतात वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना परत त्यांना मायदेशी पाठवले असताना दुबे यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Nishikant Dube)
खासदार निशिकांत दुबे यांनी ‘पाकिस्तानी दहशतवादाचा नवा चेहरा’ म्हणून वर्णन केलेल्या गोष्टीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. भारतात पाच लाखांहून अधिक पाकिस्तानी महिला विवाह करुन भारतात आल्या आहेत असे त्यांनी म्हटले आहे. ‘एक्स’ वरील सोशल मिडिया पोस्टमध्ये दुबे यांनी असे म्हटले आही की, मुलींना अद्याप त्यांचे भारतीय नागरिकत्व मिळालेले नाही. पोस्टमध्ये असे म्हटले आहे की “पाकिस्तानी दहशतवादाचा एक नवा चेहरा आता समोर आला आहे. विवाहानंर पाच लाखाहून अधिक पाकिस्तानी मुली भारतात राहत आहेत आणि त्यांना अजूनही भारतीय नागरित्व मिळालेले नाही” असे दुबे म्हणाले. घुसखोरी करणाऱ्या या शत्रूंविरुद्ध कसे लढायचे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. (Nishikant Dube)
दरम्यान भारतात वास्त्व्य करणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा तात्काळ रद्द करण्यात आले आहेत. अटारी सीमेवरील प्रोटोकॉल अधिकारी अरुण पाल यांनी सांगितले की. एएनआयशी बोलताना पाल यांनी असेही नमूद केले की याच काळात ८५० भारतीय नागरिक भारतात परतले आहेत. केवळ रविवारी २३७ पाकिस्तानी नागरिक त्यांच्या देशात परतले, तर ११६ भारतीय नागरिक परत आले. (Nishikant Dube)
हेही वाचा :