शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध : आमदार कौस्तुभ गावडे

Newly elected MLA Kaustubh Gawade felicitated by the BJP

कोल्हापूर, प्रतिनिधी : पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजपा-महायुतीचे नूतन आमदार म्हणून निवडून आलेले कौस्तुभ मुरलीधर गावडे यांचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने नागाळा पार्क येथील भाजपा जिल्हा कार्यालयात भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. (Newly elected MLA Kaustubh Gawade felicitated by the BJP)

कौस्तुभ गावडेकडून विजयाचे श्रेय भाजपला

सत्काराला उत्तर देताना आमदार कौस्तुभ गावडे म्हणाले, “हा विजय माझा एकट्याचा नसून भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे. मी माझ्या विजयाचे संपूर्ण श्रेय पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना अर्पण करतो. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे आणि आशीर्वादामुळे ही जबाबदारी पार पाडण्याची संधी मिळाली आहे. पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”

पक्षासाठी २४ तास काम करत राहणार

“पक्षासाठी २४ तास काम करत राहणार असून, पक्षसंघटनेला अधिक ताकद देण्यासाठी आणि संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यापुढे ग्राउंड लेव्हलवर जाऊन काम करणे गरजेचे आहे. हे केवळ एका व्यक्तीचे काम नसून आपल्या सर्वांचे सामूहिक दायित्व आहे. सर्वांनी कार्यकर्ता म्हणून खांद्याला खांदा लावून काम केले, तर संघटना अधिक मजबूत होईल. उद्यापासूनच कामाला सुरुवात करून शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासह त्यांच्या न्याय्य मागण्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे,” अशी ग्वाही आमदार गावडे यांनी दिली. (Newly elected MLA Kaustubh Gawade felicitated by the BJP)

भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी नूतन आमदार कौस्तुभ गावडे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. नाथाजी पाटील यांनी हा विजय भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक ताकदीचा आणि कार्यकर्त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांचा विजय असल्याचे सांगितले.

भाजपा माजी प्रदेश सचिव महेश जाधव म्हणाले, जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षाचे काम जमाने करत त्यांच्या समस्या,मागण्या समोरून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील रहावे. यावेळी  जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, राहुल चिकोडे यांनी देखील मनोगत व्यक्त केले  यावेळी माणिक पाटील चुयेकर, अमर साठे, डॉ आनंद गुरव, सुशीला पाटील, माधुरी नकाते, मेघराणी जाधव, विश्वजीत पवार  यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Newly elected MLA Kaustubh Gawade felicitated by the BJP)

Related posts

गोकुळमध्ये मतचोरी; राहूल गांधीची भाजपवर टीका

गोकुळ’मध्ये सत्तांतर रोखण्यासाठी  आणलेला अध्यादेश बेकायदेशीर

एसटीच्या ८३ हजार कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये दिवाळी भेट : प्रताप सरनाईक