नवी मुंबई : महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झाला असून आज नवी मुंबईत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हाय वे बंद करण्यासाठी जात असताना पोलिसांनी खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे रोहिणी खडसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापटही पहायला मिळाली. (NCP Takes Aggressive Stance Against Inflation)
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्यावतीने नवी मुंबईत महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारी विरोधात आंदोलन केले. आंदोलनात सुप्रिया सुळे, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, रोहिणी खडसे अग्रभागी होत्या. हे आंदोलन सायन पनवेल मार्गावर होत असल्याने पोलिसांनी आंदोलकांना रोखले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी “जब जब मोदी डरता है, पोलिस को आगे करता है” अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर पोलिसांनी सर्वप्रथम आमदार रोहित पवारांना ताब्यात घेतले. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. (NCP Takes Aggressive Stance Against Inflation)
यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले, सरकार ताकदीचा वापर करत असून लोकांच्या समस्यांवर बोलून दिले जात नाही. हे असंच सुरू राहिले तर लोकशाही राहणार नाही. आम्ही घाबरणारे लोक नसून आम्ही लढत राहणार आहोत, अशी टीका त्यांनी सरकारवर टीका केली. (NCP Takes Aggressive Stance Against Inflation)