नौदलातील जवानाची पत्नी व दोन मुलांसह आत्महत्या 

Navy personnel's wife commits suicide along with children

जमीर काझी :  मुंबई :  स्वातंत्र्याच्या दिनी नौदलातील एका जवानाने पत्नी व दोन चिमुकल्या मुलासह आपल्या आयुष्याचा अंत करण्याची घटना समोर आली आहे. कुलाब्यातील नौदलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान असलेल्या नेव्हीनगरात ही घटना घडली आहे. पुरणमल शंभूलाल मेहरा ( वय ३०) त्यांची पत्नी नामे ओमा पूरणमल मेहरा मुलगा यश (३) अशी त्यांची नावे असून मृतांमध्ये त्याशिवाय अवघ्या २ महिन्याच्या बाळाचाही समावेश आहे. पूरनमल पहिल्यांदा तिघांना विष पाजले व त्यानंतर स्वतः गळफास लावून घेतल्याची शक्यता आहे. मात्र त्यांच्या या कृत्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे कफ परेड पोलिसांकडून सांगण्यात आले. (Navy personnel’s wife commits suicide along with children)

पुरनमल शंभूलाल मेहरा हा नेव्हीमध्ये शिपाई होता.  तो पत्नीसह नेव्हीनगरमधील क्वार्टसमध्ये पत्नी व दोन मुलासह राहत होता.  १५ ऑगस्ट रोजी रात्री पुरणलाल यांच्या वडिलांनी गावाहून फोन केला होता. पण त्याला कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी नौदलाच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. नियंत्रण कक्षालाही पुरणमल आणि त्यांच्या कुटुंबियाचा प्रतिसाद न मिळाल्याने नौदलाचे कर्मचारी घरी गेले. त्यांना  घरामध्ये सर्वजण मृत अवस्थेत आढळून आले. पुरनमलने फॅनला दोरखंड लावून गळफास लावून घेतला होता.तर पत्नी व दोन मुले बेडवर पडून होते. त्यांना विष पाजण्यात आले होते.जे जे हॉस्पिटलमध्ये मरणोत्तर पंचनामा केला असून पोस्टमार्टम करण्याची प्रक्रिया चालू आहे. (Navy personnel’s wife commits suicide along with children)

 भारतीय नौदलाने दिलेल्या निवेदनात, मुंबईतील कुलाबा येथील एक कर्मचारी ,त्यांची पत्नी आणि दोन मुले त्यांच्या निवासस्थानी मृत अवस्थेत आढळले. याप्रकरणी पोलीस तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. (Navy personnel’s wife commits suicide along with children)

Related posts

दिल्ली पोलिसांच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समिती स्थापनेचा आदेश

विषारी इंजेक्शनची याचिका फेटाळली. फाशीच वैध

नरेंद्र दाभोळकर हत्येतील प्रमुख आरोपीला जामीन मंजूर