NARAYAN RANE HOSPITALIZED: नारायण राणे रुग्णालयात दाखल

NARAYAN RANE HOSPITALIZED

मुंबई : भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना मुंबईच्या जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (NARAYAN RANE HOSPITALIZED)

नारायण राणे यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन राणे यांनी चारच दिवसांपूर्वी गणेशदर्शन घेतले होते.

दरम्यान, “ज्येष्ठ नेते नारायण राणे साहेब यांना जसलोक रुग्णालयात दाखल केल्याची बातमी समजली. राणे साहेब तब्येतीची काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा, माझ्या सदिच्छा आपल्यासोबत आहेत,” असे राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी म्हटले आहे. (NARAYAN RANE HOSPITALIZED)
राणे हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते काही काळ राज्याचे मुख्यमंत्रीही राहिलेले आहेत. कट्टर शिवसैनिक म्हणून ते ओळखले जात, त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कालांतराने ते भाजपमध्ये सामील झाले. ते काही काळ केंद्रिय मंत्रीही होते. नारायण राणे हे उद्धव ठाकरे यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात.

Related posts

बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर दडपशाहीचा वरवंटा

फास्ट ट्रॅक न्यायालये म्हणजे जलद शिक्षा की जलद मुक्तता?

अन्न व औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीत भ्रष्टाचार