Modi in Varanasi: भगवान शिवाच्या आशीर्वादाने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला : मोदी

Modi in Varanasi

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (२ ऑगस्ट) दहशतवादाविरुद्ध भारताच्या कठोर कारवाईचे वर्णन करताना भगवान शिवाच्या ‘रुद्र रूपा’ चा दाखला दिला. ऑपरेशन सिंदूरने जगासमोर देशाची ताकद दाखवली. भारतावर हल्ला करण्याचे धाडस करणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही, अगदी ‘पाताल लोक’मध्ये गेले तरी सोडणार नाही, असा स्पष्ट संदेश दिला, असे मोदी म्हणाले. (Modi in Varanasi)

‘‘पहलगाम दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या २६ जणांबद्दल माझे हृदय दुःखाने भरून आले आहे,’’ असे पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या वाराणसी मतदारसंघात आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना म्हटले.

‘‘आमच्या मुलींच्या ‘सिंदूर’चा बदला घेण्याचे माझे वचन महादेवाच्या आशीर्वादाने पूर्ण झाले,’’ असे ते म्हणाले. ‘‘ऑपरेशन सिंदूरचे यश मी महादेवाच्या चरणी समर्पित करतो. १४० कोटी देशवासीयांची एकता ही ऑपरेशन सिंदूरचे बलस्थान बनली, असेही ते म्हणाले. (Modi in Varanasi)

‘‘शिव म्हणजे कल्याण पण जेव्हा दहशतवाद कुरूप डोके वर काढतो तेव्हा महादेव त्याचे ‘रुद्र रूप’ घेतात. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, जगाने भारताचे हे रूप पाहिले,’’ असे पंतप्रधान म्हणाले. (Modi in Varanasi)

विरोधकांवर टीका करताना पंतप्रधान मोदींनी आरोप केला की, देश ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा उत्सव साजरा करत असताना, ‘‘आपल्याच देशातील काही लोक यामुळे त्रासले होते. भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले हे काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना पचवता येत नाही,’’ असे ते म्हणाले.

‘‘ऑपरेशन सिंदूरचा तुम्हाला अभिमान नाही का? भारताने (पाकिस्तानमधील) दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले याचा तुम्हाला अभिमान नाही का?’’ असा प्रश्न पंतप्रधानांनी उपस्थितांना विचारला.

ते पुढे म्हणाले, ‘‘आपल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी दहशतवादी मुख्यालयांवर अचूक हल्ला करून त्यांचा नाश कसा केला याचे दृश्य तुम्ही सर्वांनी पाहिले असतील.’’ ‘‘पाकिस्तानमधील अनेक हवाई तळ अजूनही आयसीयूमध्ये आहेत. पाकिस्तानची वेदना समजण्यासारखी असली तरी धक्कादायक गोष्ट म्हणजे काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या नेत्यांना हे सहन होत नाही, याचे आश्चर्य वाटते,’’ असे मोदी म्हणाले.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर