Modi calls Putin: ट्रम्प टॅरिफ दबावाच्या पार्श्वभूमीवर मोदी-पुतिन संवाद

Modi calls Putin

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या कराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (८ ऑगस्ट) रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी दोन्ही नेत्यांनी भारत-रशिया धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी वचनबद्ध असल्याचा निर्वाळा दिला. (Modi calls Putin)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंबंधीची पोस्ट ‘एक्स’वर केली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर बोललो आणि युक्रेनवरील ‘नवीन घडामोडी’ शेअर केल्याबद्दल त्यांचे आभार मानले, असे त्यांनी म्हटले आहे.

आम्ही द्विपक्षीय अजेंडातील प्रगतीचा आढावा घेतला आणि ‘भारत-रशिया विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी त्यांच्या वचनबद्धते’चा पुनरूच्चार केला. (Modi calls Putin)

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी काल, गुरुवारी क्रेमलिनमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. रशियन सुरक्षा परिषदेचे सचिव सर्गेई शोइगु यांच्याशी बोलताना डोवाल यांनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या भारत भेटीची योजना जवळजवळ अंतिम झाल्याचे म्हटले होते.

वर्षाच्या सुरुवातीपासूनच पुतिन यांच्या भारत भेटीसाठी भारत आणि रशिया चर्चा करत आहेत. पुतिन यांनी शेवटचा भारत दौरा ६ डिसेंबर २०२१ रोजी केला होता. त्यावेळी भारताने हैदराबाद हाऊस येथे वार्षिक शिखर बैठकीचे आयोजन केले होते.

दोन्ही नेत्यांमधील चर्चा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांकडून रशियन तेल खरेदी सुरू ठेवल्याचा उल्लेख करून भारतावर अतिरिक्त शुल्क लादल्यानंतर झाली. (Modi calls Putin)

भारतावरील अतिरिक्त शुल्काच्या प्रत्युत्तरात, क्रेमलिनने अमेरिकेवर भारतावर बेकायदेशीर व्यापार दबाव आणल्याचा आरोपही केला. ‘‘आम्ही अशी अनेक विधाने ऐकतो जी प्रत्यक्षात धमक्या देणारी आहेत. अनेक देशांना रशियाशी व्यापार संबंध तोडण्यास भाग पाडण्याचे प्रयत्न करत आहेत. आम्ही अशा विधानांना कायदेशीर मानत नाही,’’ असे क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी पत्रकारांना सांगितले.
‘‘आम्हाला वाटते की सार्वभौम देशांना त्यांचे स्वतःचे व्यापारी भागीदार, व्यापार आणि आर्थिक सहकार्यासाठी भागीदार आणि विशिष्ट देशाच्या हिताचे व्यापार आणि आर्थिक सहकार्याचे स्वरूप निवडण्याचा अधिकार असला पाहिजे आणि आहे,’’ असे ते म्हणाले.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर