सोलापूर : प्रतिनिधी : राज्यातील अतिवृष्टीमुळे पुरग्रस्त शेतकरी, भूमीहीन नागरिक व शेतमजुरांना तातडीने मदत दयावी अशी मागणी आमदार रणजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. (MLA Mohite Patil)
आमदार मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन दिले आहे. निवेदनात असे म्हटले आहे की, राज्यात अतिवृष्टी व पूर्वस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिके पाण्याखाली गेले आहेत तर अनेक घरात पाणी शिरल्याने संसारपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जनावरेही मोठ्या प्रमाणात दगवाली आहेत. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्यांना मदत जाहीर केली आहे. परंतु बाधितांची संख्या लक्षणीय असल्याने अधिकच्या मदतीची आवश्यकता आहे. (MLA Mohite Patil)
शेती व्यवसायाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेती लगेच पिकणार नाही. त्यामुळे शेतकरी व भूमिहिन नागरिकांना लगेच रोजगार मिळणार नाही. त्यामुळे शेतकरी, शेतमजुर व भूमिहिन नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याचा परिणाम गावाच्या अर्थकारणावर आणि महाराष्ट्राच्या अर्थकारणांवर होणार आहे. त्यासाठी शेतकरी, शेतमजूर आणि भूमिहीन नागरिकांना आर्थिक मदत करुन दिलासा द्यावा अशी विनंती त्यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे. (MLA Mohite Patil)