श्रीहरिकोटा : भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) आणि अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था (नासा) यांचा संयुक्त उपग्रह निसार (NISAR)चे बुधवारी (३० जुलै) संध्याकाळी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. (Mission NISAR Successfull)
श्रीहरिकोटा येथून GSLV-F ने NISAR उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.
पृथ्वीवरील परिसंस्था आणि महासागरीय प्रदेशांतील घडामोडींचा अभ्यास करणे हे या उपग्रहाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. (Mission NISAR Successfull)
श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून तो प्रक्षेपित करण्यात आला. इस्रो आणि नासा यांचा पहिलाच संयुक्त उपग्रह आहे.
या उपग्रहाचे महत्त्व काय?
लहरी हवामानाचा फटका पिकांना बसतो. वादळ, पाऊस आणि अचानक बदलणारे हवामान याचा अंदाज लावता येत नसल्यामुळे पिकांचे नुकसान होते. मात्र आता ही वेळ येणार नाही. कारण पिकांच्या लागवडीपासून ते कापणीपर्यंतची माहिती हा उपग्रहच देणार आहे.
सिंथेटिक एपर्चर रडार वापरून, ‘निसार’ पिकांची भौतिक वैशिष्ट्ये तसेच माती आणि वनस्पतीतील आर्द्रतेचे प्रमाण किती आहे ते समजणार आहे. या मोहिमेत शेतजमिनीच्या छोट्या छोट्या तुकड्यांवरील पिकपाण्याची स्थिती आणि मातीचे आरोग्य ओळखण्याची क्षमता यात असल्याने या उपग्रहामुळे मिळणाऱ्या माहितीचा मोठा फायदा कृषी क्षेत्राला होणार आहे. (Mission NISAR Successfull)
विशेष म्हणजे हा उपग्रह दर १२ दिवसांनी दोनदा पृथ्वीच्या जवळजवळ सर्व भूभागाची छायाचित्रे घेईल. त्यामुळे जवळपास ३० फूट (१० मीटर) रुंदीपर्यंतच्या भूखंडांवरील पीकस्थिती समजेल. हे फोटो हाय रिझोल्युशनचे असतील. ते झूम करून पाहिले तरी एखाद्या भागाचे चित्र स्पष्ट होणार आहे. हा फोटो झूम केल्यानंतर आपल्याला हवा असलेला भाग क्रॉप केला तरी त्याचे सर्व बारीक सारीक तपशील लक्षात येतील, इतकी त्याची उच्च गुणवत्ता असणार आहे. उदाहरणार्थ, निसारने पाठवलेला डेटा वापरून, एखाद्या प्रदेशात भात रोपे कधी लावली गेली याचा अंदाज लावता येईल. हंगामात त्यांची उंची आणि बहर किती आहे, त्याचबरोबर कालांतराने रोपे आणि भातातील ओल्यातेचे निरीक्षणही करता येईल. त्यानुसार पीक व्यवस्थापन करणे शक्य होईल.