मुंबई : विशेष प्रतिनिधी : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला पर्यायी रस्ता असलेला मिसिंग लिंक लवकरच नागरिकांच्या सेवेत येणार आहे. शनिवारी (१२ जुलै) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिसिंग लिंकचा पाहणी दौरा केला. मुंबई पुणे एक्स्प्रेस वेच्या १३ किमी लांबीच्या मिसिंग लिंकचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असे सांगितले जात होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबरपर्यंत मिसिंग लिंक सेवेत येईल, असे म्हटले आहे. मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम ९४ टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल, अशी शक्यताही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. (Missing link Project)
मिसिंग लिंकचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करु असे त्यांनी म्हटले आहे. पण आमची त्यांना विनंती आहे त्यांनी ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे फार फार तर नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावे. आज आम्ही त्यांच्याशी चर्चा करुन त्याची नवीन डेडलाइन ठरवू, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. (Missing link Project)
पुण्याच्या नागरिकांना पुण्याचे एअरपोर्ट तर आहेच. तसंच, नवीन पुण्यातदेखील एअरपोर्ट होत आहे. पण आता या मिसिंग लिंकमुळे एक ते सव्वा तासात पुणेकर नवी मुंबई विमानतळावर पोहोचू शकणार आहेत. त्यामुळे मुंबई-पुणे इकोनॉमी कॉरिडॉर तयार व्हावा, अशी जी आपली अपेक्षा होती तो आता होत आहे. मिसिंग लिंक हा त्याचाच एक भाग आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. मिसिंग लिंकमुळं मुंबई-पुणे वेवरील ट्रॅफिक कमी होणार आहे. तसेच, दोन महत्त्वाचे फायदे म्हणजे ६ किमीचे अंतर कमी होणार आहे. दुसरे म्हणजे मुंबई-पुणे प्रवासासाठी अर्धा तास कमी लागणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
- कसा आहे मिसिंग लिंक प्रकल्प?
- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील १३.३ किमी लांबीचा हा पर्यायी रस्ता आहे. २०१९ मध्ये या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले होते. या भागात डोंगरभाग मोठ्या प्रमाणात असून १३० मीटर उंचीच्या केबल पुलावर काँक्रिटीकरण करण्याचे कामही सुरू होते. (Missing link Project)
- खोपोली येथून सुरू होणार पर्याय रस्ता.
- दोन आठ लेनचे बोगदे असून १.७५ किमी आणि ८.९२ किमी लांबीचा असणार आहे.
- दोन आठ लेनचे व्हायाडक्ट ७९० मीटर आणि ६५० मीटर लांबी.
- लोणावळा-खंडाळा विभागात टायगर व्हॅलीपासून १०० मीटर उंचीवर असलेला ६४० मीटर लांबीचा केबल स्टेड पूल असणार आहे.
हेही वाचा :
अंतराळात माणूस पाठवण्यासाठी ‘गगनयान’च्या इंजिनची यशस्वी चाचणी
आ. जयंत पाटील यांच्या राजीनाम्यावर आव्हाड म्हणाले…