Minta Devi : निवडणूक आयोगामुळे ३५ वर्षीय मिंतादेवीचे वय झाले १२४

Minta Devi

नवी दिल्ली : प्रतिनिधी : बिहार राज्यातील सिवानमधील दरौंधा येथील मिंता देवी या मतदार रातोरात प्रसिद्ध झाल्या आहेत. मतदार ओळखपत्रावर त्यांचे वय १२४ वर्ष पडले असून प्रत्यक्षात त्या ३५ वर्षाच्या असल्याचा दावा केला आहे. या चुकीला त्यांनी निवडणूक आयोगाला दोषी धरले आहे. निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभाराच्याविरोधात विरोधी पक्षांनी रान उठवले असून मत चोरीच्या विरोधात आज विरोधी पक्षाच्या खासदारांनी ‘१२४ नॉट आऊट ’ असा मजकूर असलेले टी शर्ट परिधान करुन आंदोलन केले. (Minta Devi)

दिल्लीतील इंडिया ब्लॉकच्या “व्होट चोरी” निषेधाच्या “१२४ नॉट आउट” पोस्टर गर्ल मिंता देवी मंगळवारी मिडियासमोर आल्या आणि त्यांनी आपण  ३५ वर्षाचे असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या वयात  ८९ वर्षांची वाढ केली असून  लिपिकीय टायपिंगच्या चुकीला दोष दिला ज्यामुळे त्यांचे जन्मवर्ष १९९० ऐवजी १९०० नोंदवले गेले. (Minta Devi)

पत्रकारांशी बोलताना मिंता देवी म्हणाल्या “ही निवडणूक आयोगाची चूक आहे. मी माझे कागदपत्रे ऑनलाइन सादर केली.  पण आता सगळे माझे वय विचारत आहेत. वाद सुरू होईपर्यंत त्यांना त्यांच्या मतदार कार्डवर “१५-०७-१९००” हे चुकीचे जन्मवर्ष लक्षात आले नाही, असेही त्या म्हणाल्या.

सिवानचे जिल्हा निवडणूक अधिकारी आदित्य प्रकाश यांनी “टायपोग्राफिकल चूक” मान्य केली आणि एका संगणक ऑपरेटरला दोषी ठरवले. “दुरुस्ती एका आठवड्यात केली जाईल,” असे त्यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले. उप निवडणूक अधिकारी सोहेल अहमद यांनी मिंटा यांनी दुरुस्तीसाठी अर्ज केल्याची पुष्टी केली.

बिहारच्या मतदार यादीच्या एसआयआरने अधिकृत आकडेवारीवर आधारित आणखी दोन “शतकवीर” उघड केले आहेत – १२० आणि ११९. एक भागलपूरच्या पीरपैंती येथील आशा देवी आणि दुसरी गोपाळगंजच्या बरौली मतदारसंघातील मंटुरिया देवी. भागलपूरच्या उपनिवडणूक अधिकाऱ्यांनी आशा देवी यांच्या वयाची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर, नियुक्त बीएलओ फरजाना खातून यांनी त्या ठिकाणी भेट दिली, त्यांचे आधार कार्ड तपासले आणि त्या १२० वर्षांच्या असल्याची पुष्टी करण्यासाठी गावकऱ्यांशी बोलले, असे अधिकृत अहवालात म्हटले आहे. बरौलीच्या सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांनी मंगळवारी दाखल केलेल्या अहवालानुसार, “शारीरिक पडताळणी” नंतर मंटुरिया देवीचे वय देखील बरोबर आढळले. (Minta Devi)

Related posts

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर

बागेश्वर बाबांचें शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या