Mehul Choksi : मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक

Mehul Choksi

Mehul Choksi

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेच्या चौदा हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी, हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला भारताच्या विनंतीवरून शनिवारी बेल्जियमच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. २०१८ मध्ये तो भारतातून पळून गेला होता. त्याला भारताने फरार घोषीत केले आहे. (Mehul Choksi)

 मुंबई उच्च  न्यायालयाने २३ मे २०१८ आणि १५ जून २०२१ रोजी जारी केलेल्या दोन  अजामीनपात्र वॉरंटच्या आधारे चोक्सीची अटक करण्यात आली. मेहुल चोक्सी आता कायदेशीर लढाईची तयारी करत आहे. बेल्जियम येथील न्यायालयात जामिनासाठी तो वकिलांमार्फत प्रयत्न करत आहे. भारताच्या प्रत्यार्पणाच्या प्रयत्नांना न्यायालयात आव्हान देण्याची तयारी करत आहे. त्याच्या प्रत्यार्पणाला विरोध करण्यासाठी वैध कारणे आहेत. त्याची तब्बेत हाही एक महत्त्वाचा मुद्दा असल्याचा त्याच्या वकिलाचा दावा आहे. (Mehul Choksi)

६५ वर्षीय फरार हिरे व्यापारी नीरव मोदीसह त्याच्या नातलगांनी पीएनबीमध्ये सुमारे १४०० कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. या गुन्ह्यात सीबीआय आणि ईडीला मेहुल चोक्सी हवा आहे. चोक्सीच्या अटकेच्या बातमीवर प्रतिक्रिया देताना, पीएनबी घोटाळ्याचा खुलासा करणारे हरिप्रसाद एसव्ही म्हणाले, “ही खरोखरच चांगली बातमी आहे. भारतात मेहुल चोक्सीने फसवलेल्या सर्व लोकांसाठी ही खूप आनंददायी बातमी आहे. तो बेल्जियममध्ये कसा पकडला गेला हे अविश्वसनीय आहे. त्याला भारतात आणण्याबरोबर त्याने लुटलेले पैसेही परत मिळवणे हेही महत्त्वाचे आहे, ही भारताची गरज आहे.” (Mehul Choksi)

हरिप्रसाद एसव्ही म्हणाले, “त्याचे प्रत्यार्पण करणे सोपे काम होणार नाही. त्याचे पाकीट भरले आहे आणि तो युरोपमधील सर्वोत्तम वकिलांना कामावर ठेवेल. विजय मल्ल्या न्यायालयात प्रत्यार्पण करण्यासाठी प्रयत्न आहे त्याप्रमाणेच मेहुल चौक्सी करण्याची शक्यता आहे. त्याला परत आणणे भारतासाठी सोपे नाही”. (Mehul Choksi)

भारत सरकारने मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी जोरदार प्रयत्न सुरू केली आहे. बेल्जियममध्ये त्याला अटक झाली असल्याने त्याच्या प्रत्यार्पणाची वेळ जवळ आली असल्याचे बोलले जाते. (Mehul Choksi)

हेही वाचा :

बालिकेच्या मारेकऱ्याची कारागृहात आत्महत्या

Related posts

PM Modi Warns

PM Modi Warns: हल्लेखोरांना सोडणार नाही

Firing on Tourist

Firing on Tourist : पर्वतांवरून उतरले आणि फायरिंग सुरू केले

Kiran Rijiju

Kiran Rijiju: ‘वक्फ’मुळे गरीब-गरजू मुस्लिमांना न्याय