बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणी २८ डिसेंबरला मोर्चा

मुंबई; विशेष प्रतिनिधी : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी होऊन मुख्य सुत्रधारासह सर्व आरोपींना अटक करावी या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने २८ डिसेंबरला बीड जिल्हाधिकारी कार्यालयवर मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती मराठा समाजाचे नेते अंकुश कदम व नरेंद्र पाटील यांनी आज (दि.२३) मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. (Sarpanch Santosh Deshmukh)

राज्यात सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनलेल्या संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलीस नि:पक्षपातीपणे तपास करत नाही. त्यामुळे, समाजात तीव्र भावना निर्माण झाल्या आहेत. यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सकळ मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांना आंदोलनाचा इशारा दिला असून मारेकऱ्यांना कठोर शिक्षा होत नाही तसेच राजकीय वरदहस्त असणाऱ्या नेत्यांची हकलपट्टी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असे कदम यांनी सांगितले.

यावेळी माजी आमदार नरेंद्र पाटील, रघुनाथ पाटील, महेश डोंगरे, धनंजय जाधव उपस्थित होते. बीड जिल्ह्याचा बिहार होऊ नये. यासह संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्री पदावरून काढून टाकावे. मुंडे यांच्या जवळचा वाल्मिकी कराड यांच्यावर ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करुन तातडीने त्याला अटक करावी, अशी मागणी त्यानी यावेळी केली. (Sarpanch Santosh Deshmukh)

हेही वाचा :

Related posts

प्रसिद्ध दिग्दर्शक शाम बेनेगल यांचे निधन

महसूल मंत्री बावनकुळेंना रामटेक; धनंजय मुंडेंना सातपुडा तर राम शिंदेंचे ज्ञानेश्वरीत असणार वास्तव्य!

मुख्यमंत्र्यांचा बंडाच्या पवित्र्यातील भुजबळांना सबुरीचा सल्ला