MARCH FOR MAHADEVI : ‘महादेवी’संदर्भात मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी बोलावली बैठक

MARCH FOR MAHADEVI

कोल्हापूर : प्रतिनिधी : नांदणी मठातील महादेवी हत्तीण परत करावी, अशी मागणी करत हजारोंचा जनसमुदाय रविवारी (३ ऑगस्ट) रस्त्यावर उतरला. नांदणी, शिरोळ, जयसिंगपूरसह परिसरातील हजारो भाविक आणि नागरिकांनी नांदणी ते कोल्हापूर पदयात्रा काढली. जामनगर-गुजरातमधील ‘वनतारा’मध्ये नेलेली महादेवी हत्तीण मठाला परत करावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. तसे निवेदन कोल्हापुरात जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. (MARCH FOR MAHADEVI)

दरम्यान, या जनक्षोभाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घ्यावी लागली. त्यांनी महादेवी हत्तीणीसंदर्भात भूमिका मांडली आणि यासंदर्भात कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींसोबत मंगळवारी (५ ऑगस्ट) बैठक बोलावल्याची घोषणा केली. यासंदर्भात सर्व कायदेशीर बाबी तपासण्यात येतील, त्यासंदर्भात बैठकीतही चर्चा होईल, असे स्पष्टपणे सांगितले. (MARCH FOR MAHADEVI)

महादेवी हत्तीणीसंदर्भातील निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा आहे. कोर्टाच्या निर्देशानुसार, राज्याच्या वनविभागाने अहवाल दिला. त्यानुसार, हत्तीणीला हलविण्याचा घेतलेला निर्णय हा सर्वस्वी कोर्टाचा आहे. यामध्ये शासनाचे कसलीही भूमिका नाही, तरीही लोकभावना लक्षात घेऊन मंगळवारी ही बैठक आयोजित केल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. (MARCH FOR MAHADEVI)

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयावर पदयात्रा आल्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांनी गुजरातमधील वातावरण हत्तीसाठी योग्य नसतानाही तो वनतारामध्ये नेण्याचा अट्टहास कशासाठी, असा सवाल करत जोरदार टीकास्र सोडले. (MARCH FOR MAHADEVI)

महादेवीसंदर्भात शासन आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेले अहवाल सकारात्मक होते. ‘पेटा’ने आणि ‘वनतारा’ने या हत्तीच्या अहवालाबाबत चुकीची माहिती दिली आहे. महादेवी आजारी होती तर सलग ४८ तास प्रवास करून तिला वनतारा, जामनगर येथे कोणत्या नियमानुसार नेण्यात आले, असा सवालही निवेदनात करण्यात आला आहे. राष्ट्रपतींना उद्देशून दिलेल्या या निवेदनात हत्तीणीला परत मठाच्या हवाली सुपूर्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

कोल्हापूर : वनतारामध्ये पाठवण्यात आलेली नांदणी मठातील महादेवी हत्तीण मठाला परत करावी, या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी निवेदन स्वीकारले.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर