दीडशे देशांच्या सीमा ओलांडून धावायची लंडन-कलकत्ता बस

London-Calcutta bus used to travel across 150 countries

तुम्हाला माहित आहे का१९६० च्या दशकात भारतातील कोलकाता म्हणजे तेव्हाचे कलकत्ता ते इंग्लंडमधील लंडन पर्यंत बस सेवा चालायची? ही डबल-डेकर बस “अल्बर्ट” म्हणून ओळखली जायची आणि तिच्या प्रवासांना “अल्बर्ट टुर्स” असे म्हटले जायचे. विशेष म्हणजेहा जगातील सर्वात लांब बस मार्ग होता. लंडन ते कोलकाता या एकतर्फी प्रवासासाठी १४५ पौंड म्हणजे १३ हजार ५१८ रुपये खर्च यायचा. जो त्या काळात खूप मोठा मानला जायचा.

जगातील सर्वात लांब बस मार्ग

.सेंट्रल वेस्टर्न डेलीच्या अहवालानुसार, ब्रिटिश प्रवासी अँडी स्टुअर्ट यांनी १९६८ मध्ये ही बस विकत घेतली. त्यांचा उद्देश सिडनी ते लंडन असा भारतामार्गे प्रवास करण्याचा होता. ८ ऑक्टोबर १९६८ रोजी त्यांनी सिडनीच्या मार्टिन प्लेस येथून १३ सहप्रवाशांसह प्रवास सुरू केला.सुमारे १६,००० किमीचा प्रवास १३२ दिवसांत पूर्ण करून १७ फेब्रुवारी १९६९ रोजी ते लंडनला पोहोचले. ही बस इंग्लंड ते सिडनी असा प्रवास करताना बेल्जियम, पश्चिम जर्मनी, ऑस्ट्रिया, युगोस्लाव्हिया, बल्गेरिया, तुर्की, इराण, अफगाणिस्तान, पश्चिम पाकिस्तान, भारत, बर्मा, थायलंड, मलाया आणि सिंगापूर या देशांतून जात असे. भारतामध्ये अल्बर्टने दिल्ली, आग्रा, अलाहाबाद, बनारस मार्गे शेवटी कोलकाता गाठले.

बसचे वेळापत्रक

 अल्बर्टच्या सेवेसाठी वर्षभराचे वेळापत्रक तयार करण्यात आले होते. ४, ५, ६, ७, ८ आणि ९ क्रमांकाच्या फेऱ्या सिडनीपर्यंत जात असत,तर १२ ते १५ क्रमांकाच्या फेऱ्या लंडन ते कोलकाता दरम्यान चालत असत.

अल्बर्ट टुर्सची आलिशान सोय

 अल्बर्ट बसमधील प्रवास म्हणजे त्या काळातील आलिशान अनुभव होता.खालच्या मजल्यावर वाचन आणि जेवणासाठी लाउंज होता. वरच्या मजल्यावर परिसर पाहणीसाठी खास बैठकीची सोय होती. पूर्ण सुसज्ज स्वयंपाकघर होते त्यामुळे ताजे जेवण मिळायचे. पार्टीसाठी रेडिओ आणि टेप म्युझिकची सोय होती. बसमध्ये फॅन हीटर होते, जे प्रवाशांना उबदार ठेवत. आतल्या सजावटीत रंगीबेरंगी पडदे, गालिचे आणि प्रत्येकासाठी स्वतंत्र झोपण्याची व्यवस्था होती. म्हणजे ही बस स्लीपर कोच होती. या सर्व सुविधांमुळे अल्बर्ट म्हणजे अक्षरशः “घरापासून दूर असलेले घर” वाटत असे. (London-Calcutta bus used to travel across 150 countries)

मार्गातील पर्यटनस्थळे

इंग्लंड ते सिडनी प्रवासादरम्यान अल्बर्ट अनेक सुंदर पर्यटनस्थळांमधून जात असे, इस्तंबूलचे गोल्डन हॉर्न, दिल्लीचे मयूर सिंहासन, आग्र्याचा ताजमहाल, बनारस, कॅस्पियन समुद्र किनारा, ब्लू डॅन्यूब, र्‍हाईन व्हॅली, खैबर पास,काबूल खोरे अशी ही ठिकाणे होती. याशिवाय, दिल्ली, काबूल, इस्तंबूल, तेहरान, व्हिएन्ना, साल्झबर्ग यांसारख्या शहरांमध्ये खरेदीसाठी खास दिवसही राखून ठेवले जात असत.

१९७६ पर्यंत अल्बर्टने कोलकाता–इंग्लंड दरम्यान सुमारे १५ फेऱ्या केल्या. इंग्लंड–ऑस्ट्रेलिया दरम्यान ४ फेऱ्या पूर्ण केल्या. या प्रवासात जवळपास १५० सीमा ओलांडल्या, आणि अनेक देशांमध्ये “मैत्रीचा दूत” म्हणून ही बस ओळखली जायची. (London-Calcutta bus used to travel across 150 countries)

Related posts

मध्य प्रदेशात उद्ध्वस्त हंगामामुळे `कल्याण वर्षातच` शेतकरी संकटात

महिला आरक्षणात मागास महिलांसाठी तरतूद हवी

मृत्युदंडाच्या शिक्षा अपिलात का टिकत नाहीत?