जीन्सचा छोटासा खिसा नेमका कशासाठी बनवला?

तुम्ही जीन्स वापरत असाल तर माहित असेल की, मोठ्या पुढच्या खिशाच्या आत एक छोटासा खिसा असतो. तो नेमका कशासाठी असतो, असा प्रश्न अनेकांना पडतो. आज बहुतेक जण त्यात नाणी, चाव्या किंवा एखादी छोटी वस्तू ठेवतात. पण हा खिसा मूळात त्यासाठी बनवलेलाच नव्हता. (Little Pocket on Jeans)

परफेक्ट जीन्स शोधताना आपण तिचा फिट, रंग, डिझाइन आणि आराम या गोष्टींकडं लक्ष देतो. अशाच जीन्समध्ये मोठ्या खिशाच्या आत असलेला हा छोटासा खिसा दिसतो.

जीन्स सुरुवातीच्या नमुन्यांमध्ये हा छोटा खिसा नव्हता. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाच्या माहितीनुसार, लेव्ही स्ट्रॉस आणि जेकब डेव्हिस यांनी १८७३ मध्ये याचं पेटंट घेतलं. मात्र १८९० च्या दशकात मोठ्या प्रमाणावर तयार होणाऱ्या जीन्समध्ये हा छोटा खिसा नियमितपणे दिसू लागला. (Little Pocket on Jeans)

पॉकेट वॉच ठेवण्यासाठी

लेव्ही स्ट्रॉस आणि कंपनीनं हा खिसा आपल्या ग्राहकांचा विचार करून तयार केला होता. त्या काळात शेतकरी, खाणकामगार, सुतार, रेल्वे कामगार यांच्याकडं मनगटी घड्याळं नव्हती. ते पॉकेट वॉच वापरत असत.

कोटाच्या खिशातून घड्याळ काढण्याची दृश्यं आपण जुन्या चित्रपटांत पाहिली असतील. मात्र कष्टाची काम करणाऱ्या कामगारांसाठी कोट वापरणं शक्य नव्हतं. त्यामुळं त्यांच्या पॉकेट वॉचसाठी जीन्समध्ये हा स्वतंत्र आणि सुरक्षित छोटा खिसा तयार करण्यात आला.

काही जीन्सना या खिशाच्या तोंडाशी दोन्ही बाजूंना धातूचे छोटे रिव्हेट्स म्हणजे खिळ्यासारखे धातूचे तुकडे दिसतात. तेही केवळ सजावटीसाठी नसतात. खिसा फाटू नये म्हणून त्याला मजबुती देतात. त्यामुळं जीन्स फाटली तरी हा खिसा टिकून राहतो. जीन्समध्ये हा छोटा खिसा आजही कायम आहे.

यामागं दोन प्रमुख कारणे आहेत. (Little Pocket on Jeans)

पहिलं म्हणजे, हा जीन्सच्या पारंपरिक डिझाइनचा अविभाज्य भाग बनला आहे. तो काढून टाकला तर जीन्सची ऐतिहासिक ओळखच हरवेल.

दुसरे म्हणजं, हा खिसा आजही अनेक छोट्या वस्तू ठेवण्यासाठी उपयोगी पडतो. उदाहरणार्थ चिल्लर, चाव्या वगैरे.

काही जण या खिशाला सनग्लासेसही अडकवतात.

जीन्सनं फॅशनचे अनेक बदल पाहिले, तरी तिची लोकप्रियता कायम राहिली. देश, व्यवसाय किंवा आर्थिक स्थिती कोणतीही असो, जीन्स आजही जगभरातील लोक वापरतात. कामगारांच्या गरजेतून जन्माला आलेला हा छोटासा खिसा आजही जीन्सच्या ओळखीचा अविभाज्य भाग बनून टिकला आहे.

Related posts

सार्वजनिक शौचालयात टॉयलेट सीट पुढून उघडी का असते?

अर्जेटिनाला कडवी झुंज देणारा  केप वर्दे हा देश कुठे आहे?

८००० किलोमीटर लांबीची ‘ग्रेट ग्रीन वॉल’