LG Manoj Sinha asserts: निःसंशयपणे सुरक्षा यंत्रणांचे अपयश; पहलगामप्रश्नी कबुली

LG Manoj Sinha asserts

नवी दिल्ली : पहलगाममध्ये झालेला हल्ला नि:संशयपणे सुरक्षा यंत्रणांचे अपयश होते, अशी स्पष्ट कबुली जम्मू-काश्मिरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिली. (LG Manoj Sinha asserts)

जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल म्हणून त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. टाइम्स ऑफ इंडियाला त्यांनी मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ला हा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ला होता. ‘‘शेजारी (पाकिस्तान) राष्ट्राचा हेतू जातीय तेढ निर्माण करण्याचा होता. मी या घटनेची पूर्ण जबाबदारी घेतो, ’’असेही ते म्हणाले.

पहलगाम हल्ल्याने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद कमी होत चालला आहे हा समज मोडून काढला आहे का?, असे विचारले असता, पहलगाममध्ये जे घडले ते अत्यंत दुर्दैवी होते; निष्पाप लोक निर्दयपणे मारले गेले. मी या घटनेची संपूर्ण जबाबदारी घेतो. येथे सर्व सामान्य समज असा आहे की दहशतवादी पर्यटकांना लक्ष्य करत नाहीत. ज्या ठिकाणी हल्ला झाला ते मोकळे मैदान आहे. तेथे सुरक्षा दल तैनातीसाठी कोणतीही सुविधा किंवा जागा नाही. (LG Manoj Sinha asserts)

हा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ला होता. या प्रकरणात एनआयएने केलेल्या अटकेवरून स्थानिक सहभागाची स्पष्ट होतो, परंतु तरीही जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे बिघडले आहे असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल. हा हल्ला देशाच्या आत्म्यावर जाणूनबुजून केलेला हल्ला होता. शेजारी (पाकिस्तान) चा हेतू जातीय फूट निर्माण करणे आणि देशाच्या इतर भागात राहणाऱ्या जम्मू-काश्मीरमधील लोकांविरुद्ध वातावरण निर्माण करणे हा होता. तसे वातावरणही काही काळ निर्माण झाले. (LG Manoj Sinha asserts)

पाकिस्तानला जम्मू-काश्मीर शांत आणि समृद्ध हवे असे वाटत नाही. गेल्या पाच वर्षांत जम्मू-काश्मीरची अर्थव्यवस्था दुप्पट झाली आहे. पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. हा (हल्ला) पाकिस्तानने काश्मीरच्या आर्थिक विकासावर केला होता. परंतु हल्ल्यानंतर काश्मीरमधील लोकांनी केलेल्या निषेधाने पाकिस्तान आणि दहशतवादी संघटनांना योग्य उत्तर मिळाले, याकडेही सिन्हा यांनी लक्ष वेधले. (LG Manoj Sinha asserts)

ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू-काश्मीरमध्ये कोणताही हल्ला झालेला नाही. यापुढेही असेच वातावरण राहील असे तुम्हाला वाटते का? या प्रश्नावर सिन्हा यांनी ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानसाठी लाल रेषा आखल्या आहेत. भारताने स्पष्ट केले आहे की कोणताही दहशतवादी हल्ला युद्धाचा प्रकार मानला जाईल. आपल्या सैन्याने ज्या पद्धतीने पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर अचूक हल्ला केला आणि जेव्हा त्यांनी आमच्या लष्करी आणि नागरी मालमत्तेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी त्यांचे हवाई तळ कसे नष्ट केले, यावरून पाकिस्तानला कठोर संदेश मिळाला आहे, असे सांगितले.

 तरीही, ज्या देशाने दहशतवादाला आपले राज्य धोरण बनवले आहे, त्यावर विश्वास ठेवता येणार नाही. मला खात्री आहे की गृह मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि आमच्या गुप्तचर संस्था पाकिस्तानवर लक्ष ठेवून आहेत. पण ऑपरेशन सिंदूर नंतर जम्मू-काश्मीरमध्ये एकही दहशतवादी हल्ला झालेला नाही हे खरे आहे, असे ते म्हणाले. पहलगाम घटनेनंतर पर्यटकांचे आगमन जवळजवळ थांबले होते. आम्हाला वाटले होते की अमरनाथ यात्रा हा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. येथील पर्यटनस्थळे सुरू झाली आहेत. इतरही टप्प्याटप्प्याने सुरू होतील. प्रत्येक ठिकाणी एक मजबूत सुरक्षा योजना अंतिम केल्यानंतर पुढील पावले उचलली जातील, असेही सिन्हा यांनी सांगितले.

हेही वाचा :
शिवसेना निवडणूक चिन्हावर ऑगस्टमध्ये सुनावणी
पुरे झाले, अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा; आधी मराठी मुलूख सांभाळा

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर