बारावीच्या परीक्षेत कोकण विभाग अव्वल, मुलींची बाजी

Konkan Division Tops Class 12 Exams

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल जाहीर झाला असून राज्यात कोकण विभाग अव्वल ठरला आहे. कोकण विभागाचा ९४.१४ टक्के निकाल लागला आहे. बारावीचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला सर्वात कमी ८४.१४ टक्के निकाल लातूर विभागाचा आहे. यंदा मुलींनी परीक्षेच्या निकालात बाजी मारण्याची परंपरा कायम ठेवली आहे .दुपारी एक वाजता शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. (Konkan Division Tops Class 12 Exams)

राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेत बारावीच्या निकालाची माहिती दिली. विज्ञान शाखेत सर्वाधीक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या शाखेचा निकाल ९६.४४ टक्के लागला आहे. कला शाखेचा ९८.०२ तर वाणिज्य शाखेचे ८७.०३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. १५३ पैकी २६ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. (Konkan Division Tops Class 12 Exams)

मुलींना यंदा निकालात बाजी मारली आहे. मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९३.१५ टक्के आहे. मुलाची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८६.८० टक्के इतकी आहे. (Konkan Division Tops Class 12 Exams)

Related posts

ठाकरे शिवसेनेत फूट? सहा खासदारांचा वेगळा गट

माझ्यावरील हल्ला ‘आरएसएस’नेच केला ; अभिजीत दिपकेंचा आरोप!

चांदीवाल अहवाल सार्वजनिक करा: अनिल देशमुख