Kolhapur Bar Association protests : कोल्हापुरातील वकिलांकडून सनातन विचारांचा निषेध

Kolhapur Bar Association protests

कोल्हापूर : प्रतिनिधी : सुप्रिम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच आणि जिल्हा न्यायालयातील वकिलांनी काम बंद आंदोलन करुन सनातन विचारांचा निषेध करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही.आर. पाटील होते. (Kolhapur Bar Association protests)

सरन्यायाधीश गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात हल्ल्याचा निषेध करण्यासाठी बार असोसिएशन मध्ये निषेध सभा झाली.  बैठकीत सरन्यायाधीश गवई यांच्यावरील हल्ल्याचा एकमुखाने निषेध करण्यात आला. तसेच तीन ठराव मांडण्यात आले. न्यायमूर्तींनी सुमोटो कारवाई करावी, असाही ठराव मंजूर करण्यात आला.

संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी सनातनीय विचारा विरोधात ॲक्शन कमिटी नेमण्याची मागणी वकिलातून पुढे आली. अखेर ही कमिटी नेमून त्याचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती तानाजी नलवडे यांच्याकडे देण्यात येत असल्याचे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. व्ही.आर. पाटील यांनी जाहीर केले. (Kolhapur Bar Association protests)

सरन्यायाधीशांवर हल्ला करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोर याचा आज निषेध करण्यात आला. राकेश किशोर यांनी ‘सनातन’ चा उल्लेख केल्यामुळे या विचारांचा  सभेत निषेध करण्यात आला. निवृत्त न्यायमूर्ती नलवडे यांनी निषेध सभेत तीन ठराव मांडले. पहिल्या ठरावात गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला या घटनेचा निषेध करण्यात आला. दुसरा ठरावात सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी सुमोटो राकेश किशोरवर कारवाई करावी. तिसऱ्या ठरावात सनातन विचाराचा निषेध करण्यात आला. याच वेळी सनातनीय विचारामुळे लोकशाही, संविधान धोक्यात येत असल्याने ते वाचविण्यासाठी ॲक्शन कमिटी तयार करण्याचा निर्णय झाला. याला सर्वांमध्ये मंजुरी देण्यात आली. कमिटीच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती नलवडे यांची नियुक्ती केली असून ॲड प्रकाश मोरे यांच्यासह अन्य वकिलांचा समितीत समावेश केल्याचे अध्यक्ष पाटील यांनी जाहीर केले. (Kolhapur Bar Association protests)

लोकशाहीवर हा हल्ला आहे, वकिलानी आता शांत बसले तर लोकशाही आणि संविधान ही राहणार नाही. केवळ निषेध करून चालणार नाही तर कोल्हापुरातूनच या विचाराच्या विरोधात आंदोलन उभा करावे अशी ही मागणी झाली.

यावेळी महादेवराव आडगुळे, प्रकाश मोरे, प्रशांत चिटणीस, अजित मोहिते, समीउल्ला पाटील, किरण पाटील, श्री भांदिगरे, व्ही.आर.पाटील, पी.आर.पाटील, बाळासाहेब पाटील, रणजीत गावडे, सर्जेराव खोत, शिवाजीराव राणे, कल्पना माने, राजेंद्र मंडलिक यांच्यासह वकिलांनी मनोगत व्यक्त केले.

स्थानिक पोलीस ठाण्यात हल्ला करणाऱ्या वकीला विरोधात एफ आय आर दाखल करणे, मी उद्यापासून तीन दिवस लालफित लावून काम करणे असे हे निर्णय घेण्यात आले.

सरन्यायाधीश गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाचा कोल्हापूर सर्किट बेंचच्या बार असोसिएशन मध्येही दुपारी निषेध करण्यात आला. यावेळी सनातन विचारांच्या वृत्तीचा निषेध करण्यात आला.

इंडिया आघाडीच्यावतीने निदर्शने

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध इंडिया आघाडीच्यावतीने करण्यात आला. शिवाजी चौकात निदर्शने करण्यात आली. आंदोलनात शिवसेनेचे विजय देवणे, भाकपचे उदय नारकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर.के. पोवार, भारती पोवार, दगडू भास्कर, सुभाष देसाई, कॉ. चंद्रकांत यादव, रघुनाथ कांबळे, विशाल देवकुळे, राजू यादव यांच्यासह इंडिया आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर