Kaustubh Gawade : कौस्तुभ गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त २०० जणांचे रक्तदान

Kaustubh Gawade

 कोल्हापूर  : प्रतिनिधी : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कौस्तुभ गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या रक्तदान शिबिरात २०० जणांनी रक्तदान केले.   श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूर आणि बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर, महाराष्ट्र यांच्या वतीने शिबिराचे आयोजन शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे स्मृतिभवन या ठिकाणी करण्यात आले. (Kaustubh Gawade)

रक्तदान शिबीराचे उद्घाटन  कौस्तुभ गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी  बोलताना कौस्तुभ गावडे म्हणाले, रक्तदान सर्वात श्रेष्ठ दान असून रक्तदान केल्यामुळे एखाद्यास जीवदान तर मिळतेच पण त्याचबरोबर एका सामाजिक कार्यात सहभागी झाल्याचे समाधानही मिळते. 

            श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांची सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष हितेंद्र साळुंखे यांनी बॉम्बे ब्लड ग्रूप हा दुर्मिळ रक्तगट असून गरजू रुग्णांना मोफत रक्त मिळविण्यासाठी ९९७००१८००१ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही केले. (Kaustubh Gawade)

            या शिबिराचे आयोजन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष  प्राचार्य अभयकुमार साळुंखे व संस्था सेक्रेटरी प्राचार्या सौ. शुभांगी गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी २०० रक्तदात्यांनी रक्तदान करुन सामाजिक भान जपले.  याप्रसंगी प्रत्येक रक्तदात्याला स्मार्ट वॉच, एअर बड, पेन ड्राईव्ह् यासारख्या भेटवस्तू देण्यात आल्या. (Kaustubh Gawade)

            कार्यक्रमाचे स्वागत पतसंस्थेचे संचालक सुहास पाटील यांनी केले तर आभार विनोद पन्हाळकर यांनी मानले.  यावेळी बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर, महाराष्ट्र या संघटनेचे विक्रम यादव, किर्ती कांबळे, सूरज देशमुख, ज्योती माने, नयुब मोमीन, सुहास पाटील आणि नर्सिंग स्टाफ यांची उपस्थिती होता.

याप्रसंगी पतसंस्थेचे सर्व संचालक व स्टाफ, मुरलीधर गावडे, सांगली जिल्हा विभागप्रमुख प्राचार्य पी.एम.हाके, शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरींग ॲण्ड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य विरेन भिर्डी,  एन.सी.सी. प्रमुख कॅप्टन सुनीता भोसले, लेप्टनंट जितेंद्र भरमगोंडा, एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा.संदीप पाटील, डॉ. प्रदीप पाटील यांची उपस्थिती होती. (Kaustubh Gawade)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर