कोल्हापूर : प्रतिनिधी : पुणे शिक्षक मतदार संघ निवडणुकीत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी विजय मिळवला. तर पुणे पदवीधर मतदार संघ निवडणुकीत भाजप उमेदवार स्मिता जाधव यांचा पराभव करत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख जाधव विजयी झाल्या. महायुतीला पदवीधरमध्ये पराभव स्वीकारावा लागला पण राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने मात्र या निवडणुकीत चांगलीच बाजी मारली. ३० तासांहून अधिक काळ निवडणूक प्रक्रिया सुरू होती. (Kaustubh Gawade and Harshada Deshmukh are in the lead)
२७ व्या फेरीनंतर कौस्तुभ गावडेंची निर्णायक आघाडी
पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल सभागृहात मंगळवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरूवात झाली आहे. पुणे विभाग शिक्षक मतदार संघ मतमोजणीत ५१ हजार ५११ वैध ठरली. त्याचा कोटा २५ हजार ७५६ मताचा कोटा ठेवण्यात आला. पण पहिल्या पंसतीच्या मतमोजणीत कोणताही उमेदवार कोटा पूर्ण करु शकला नाही. कौस्तुभ गावडेंना पहिल्या पसंतीची १७ हजार ५५८ मते मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना ११ हजार २८५ मते मिळाली. सानप यांना शिवसेना शिंदे पक्षाने पाठिंबा दिला. माजी आमदार रासपचे उमेदवार दत्तात्रय सावंत यांना १० हजार ३४१ मते मिळाली. तर विद्यमान आमदार काँग्रेसचे उमेदवार जयंत आसगांवकर यांना ८३०५ मते मिळाली. ते चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. (Kaustubh Gawade and Harshada Deshmukh are in the lead)
कोणताही उमेदवार विजयी मतांचा कोटा पूर्ण करु शकला नसल्याने दुसऱ्या क्रमांकाची पसंतीसाठी मतमोजणी झाली. २७ व्या बाद फेरी अखेर भाजपचे कौस्तुभ गावडे यांनी २०,११८ मते घेत निर्णायक आघाडी घेतली. दुसऱ्या क्रमांकावरील सचिन सानप यांना १३,६४२ तर तिसऱ्या क्रमाकांवरील दत्तात्रय सावंत १२,६८७ मते मिळाली आहेत. अखेर सर्व फेऱ्यानंतर भाजपच्या कौस्तुभ गावडेंना निवडणूक अधिकारी शितल तेली यांनी विजयी घोषीत केले.
पदवीधरमध्ये हर्षदा जाधवांना १ लाख ११ हजार मते
पुणे पदवीधर मतदार संघात भाजपच्या स्मिता जाधव आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख जाधव याच्यात थेट लढत सुरू आहे. मतमोजणीत २ लाख २६ हजार २२४ मते वैध ठरली. तर १ लाख १३ हजार ११३ मतांचा कोटा ठरवण्यात आला. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रथम पसंतीच्या मतांची मोजणी पूर्ण झाल्यानंतरही विजयासाठी आवश्यक असलेला १ लाख १३ हजार ९५ मतांचा कोटा पूर्ण न झाल्याने पुढील पसंतीच्या मतांची मोजणी सुरू आहे. आतापर्यंत २१ व्या बाद फेरीनंतर हर्षदा देशमुख-जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार पक्ष) यांना १ लाख ११ हजार २७९ मते मिळाली आहेत, तर डॉ. स्मिता योगेश जाधव यांना १ लाख २ हजार ४२७ मते मिळाली आहेत. त्यामुळे हर्षदा देशमुख-जाधव यांनी डॉ. स्मिता जाधव यांच्यावर ८ हजार ८५२ मतांची आघाडी घेतली आहे. विजयासाठी आवश्यक असलेला कोटा पूर्ण करण्यासाठी त्यांना आणखी १ हजार ८१६ मतांची गरज आहे. ३९ फेऱ्यानंतर हर्षदा देशमुख : १,११,७१७ मते तर स्मिता जाधव : १,०२,७९७ मते मिळाली.
इतर उमेदवारांना मिळालेली मते अशी
सुनिल जबरचंद मोदी (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) – ३ हजार ६६ मते, सोमनाथ जनार्धन साळुंखे – २ हजार ६३८ मते, नामदेवराव जाधव – १ हजार ९५५ मते, लक्ष्मण साहेबराव हरणावळ – १ हजार ४७२ मते. (Kaustubh Gawade and Harshada Deshmukh are in the lead)