Jotiba yatra: घुमला ‘चांगभलं’चा गजर

Jotiba yatra

कोल्हापूर : ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’च्या गजरात शनिवारी (१२ एप्रिल) वाडी रत्नागिरी येथे श्री जोतिबाची चैत्र यात्रा पार पडली. गुलाल-खोबऱ्याच्या उधळणीत भाविक न्हाऊन गेले. यावेळी ढोलताशांच्या गजरात सासनकाठ्यांची मिरवणूकही पार पडली. (Jotiba yatra)

गुलालाच्या उधळणीत अख्खा डोंगर न्हाऊन गेला. मानाच्या सासनकाठ्यांची यावेळी वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. भाविकांनी भक्तिभावाने सासनकाठ्यांचे दर्शन घेतले. यात्रेसाठी अनेक भाविक देव डोक्यावर घेऊन आले होते. अनेकांनी भक्तिभावात तल्लीन होऊन सासनकाठ्या नाचवल्या.

Related posts

पंतप्रधान मोदींनी लुटला फुटबॉल खेळण्याचा आनंद

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी