JNU Election Results: ‘जेएनयू’चा गड डाव्या आघाडीने राखला

JNU Election Results

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघ (जेएनयूएसयू) च्या २०२४-२५ च्या निवडणुकीत डाव्या आघाडीने आपला गड कायम ठेवला आणि चारपैकी तीन प्रमुख पदे जिंकली. या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही (एबीव्हीपी) चांगली कामगिरी केली. (JNU Election Results)

नितीश कुमार (एआयएसए) अध्यक्षपदी, मनीषा (डीएसएफ) उपाध्यक्षपदी आणि मुंतेहा फातिमा (डीएसएफ) सरचिटणीसपदी निवडून आल्या.

तथापि, एबीव्हीपीने संयुक्त सचिवपद जिंकून दशकभरापासूनचा दुष्काळ दूर केला. या जागेवर त्यांचे वैभव मीणा विजयी झाले. (JNU Election Results)

मतमोजणीदरम्यान, चारही केंद्रीय पॅनेल पदांवर अभाविपचे उमेदवार आघाडीवर होते. जेएनयूमधील पारंपारिक डाव्या वर्चस्वाला ते एक मजबूत आव्हान समजले जाते. मात्र अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सरचिटणीसपदाच्या शर्यतीत अखेर ते कमी पडले. असे असले तरी मतातील फरक खूपच कमी होता, हे उल्लेखनीय म्हणावे लागेल. त्यामुळे कॅम्पसमध्ये कोणत्या दिशेने वारे वाहत आहे, हे लक्षात येते.

‘‘आम्ही विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी काम करू. प्रत्येक विद्यार्थ्याचा आवाज ऐकला जाईल. त्याचा आदर केला जाईल, याची आम्ही खात्री देतो.

नितीश कुमार, नवनिर्वाचित अध्यक्ष, जेएनयू

कॅम्पसमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे निवडणुका उशीरा झाल्या. २५ एप्रिल रोजी झालेल्या निवडणुकीत जवळजवळ ७० टक्के उत्साही मतदान झाले.

सुमारे ५,५०० विद्यार्थ्यांनी मतदान केले. या चौरंगी लढतीलत एआयएसए-डीएसएफ, एबीव्हीपी आणि एनएसयूआय-फ्रॅटर्निटी आघाडीचे उमेदवार रिंगणात होते.

कौन्सिलर निवडणुकीत, अभाविपने ४२ पैकी २३ जागा जिंकून इतिहास रचला. १९९९ नंतरची त्यांची ही सर्वोत्तम कामगिरी. त्यांच्या उमेदवारांनी अभियांत्रिकी विद्यालय, सामाजिक विज्ञान, आंतरराष्ट्रीय अभ्यास, संस्कृत आणि भारतीय अभ्यास विभागात उल्लेखनीय यश मिळवले. (JNU Election Results)

अभाविपच्या या कमबॅकमुळे कॅम्पस राजकारणात नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे. नेते आणि समर्थकांनी या निकालांना ‘‘टर्निंग पॉइंट’’ असे म्हटले आहे. नवनिर्वाचित नेत्यांनी विद्यार्थ्यांच्या हिताचे प्रतिनिधित्व करण्याची आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढण्याचा निर्धार बोलून दाखवला.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर