CCTV surveillance : मुंबई रेल्वेस्थानकांवर कडक सुरक्षा यंत्रणा

CCTV surveillance

मुंबई : विशेष प्रतिनिधी : पहेलगाममधील दहशतवादी हल्ल्याने देशाला हादरवून टाकले. या हल्ल्यातील दहशतवाद्यांचा शोध अद्याप लागलेला नाही. तथापि, त्यांच्याविषयी सहानुभूती दाखवणारे आणि त्यांना मदत करणाऱ्यांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर सीमेवर तसेच संपूर्ण खोऱ्यात सुरक्षा दलांनी शोधमोहिमा तीव्र केल्या आहेत. (CCTV surveillance)

या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना पाकिस्तानी नागरिक शोधून त्यांची परत पाकिस्तानला रवानगी करण्याच्या सूचना केंद्र सरकारने राज्य सरकारे आणि केंद्रशासीत प्रदेशांना दिल्या आहेत. सर्वत्र सुरक्षा यंत्रणा कडक करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर महानगरी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील मोक्याच्या ठिकाणांसह सर्व रेल्वेस्थानकांवरील सुरक्षा यंत्रणाही भक्कम करण्यासाठी पावले उचलली आहेत. (CCTV surveillance)

त्याचाच भाग म्हणून मुंबईतील सर्व रेल्वेस्थानकांवरील यंत्रणांनी प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. सुरक्षा व्यवस्था व्यापक केली आहेत. रेल्वे पोलिस पूर्णपणे सतर्क आहेत. स्थानकांवर सुरक्षेसाठी सुमारे दहा हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे कडक देखरेख ठेवली जात आहे. (CCTV surveillance)

पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट, मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे टर्मिनस, बोरिवली आणि मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि कल्याण या प्रमुख स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. या स्थानकांवर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात. त्यामुळे साहजिकच येथे प्रवाशांची मोठी गर्दी असते. ही बाब लक्षात घेऊन तसेच प्रवासी आणि पर्यटकांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले. (CCTV surveillance)

१३९ रेल्वे स्थानके
मुंबई मध्य आणि पश्चिम रेल्वे अंतर्गत एकूण १३९ रेल्वे स्थानके आहेत. येथून रोज सुमारे ३,२०० लोकल गाड्या धावतात. या गाड्यांमधून दररोज ७५ ते ८० लाख प्रवासी प्रवास करतात. शिवाय शेकडो लांब पल्ल्याच्या गाड्याही धावतात. त्यांची संख्याही लाखांनी आहे. हे सर्व लक्षात घेता सर्व स्थानके सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी सज्ज आहेत. देखरेख अधिक कडक करण्यात येत आहे.

हेही वाचा :
सिंधू जलकरार स्थगितीचे नेमके काय परिणाम?
पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्सवर बंदी

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर