Jayashree Patil joins BJP: जयश्री पाटील यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश

Jayashree Patil joins BJP

मुंबई : विशेष प्रतिनिधी : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी समर्थकांसह बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वांचे स्वागत केले. (Jayashree Patil joins BJP)

सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश झाला. या वेळी आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, ज्येष्ठ नेते शेखर इनामदार, सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग आदी उपस्थित होते.

श्रीमती पाटील ह्या दिवगंत माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या लोकहिताच्या अनेक निर्णयांची यावेळी आठवण सांगितली. वसंतदादांच्या समाजकार्याचा वारसा जयश्रीताई पुढे चालवत आहेत. काँग्रेसने त्यांच्या कार्याची दखल घेतली नाही, मात्र भाजपा परिवारामध्ये त्यांची आणि कार्यकर्त्यांची आपुलकीने काळजी घेतली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले. सांगली जिल्ह्यात भाजपाची ताकद जयश्रीताई यांच्या प्रवेशामुळे वाढणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Jayashree Patil joins BJP)

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, वसंतदादा घराण्यातील व्यक्ती भाजपामध्ये प्रवेश करत आहे याला मोठे महत्व आहे. कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता या सर्वांनी भाजपा प्रवेशाचा निर्णय घेतला आहे.

जयश्री पाटील यांनी, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राज्याच्या, सांगलीच्या विकासासाठी भाजपामध्ये प्रवेश करत आहोत असे  सांगितले. काँग्रेसने अन्याय केल्याने विधानसभा निवडणुकीवेळी बंडखोरी केली होती. मात्र भाजपामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना सन्मानजनक वागणूक मिळेल याची खात्री आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली. . (Jayashree Patil joins BJP) माजी महापौर किशोर शहा, कांचनताई कांबळे, प्रशांत पाटील, उत्तम साखळकर, स्थायी समितीचे माजी सभापती संतोष पाटील, शेवंताताई वाघमारे, माजी नगरसेवक अजित सूर्यवंशी, रोहिणी पाटील, मृणाल पाटील, करण जामदार, प्रकाश मुळके, अजित दोरकर, तानाजी पाटील, सुभाष यादव, आनंदराव पाटील, जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष सुनील जाधव पाटील आदींनीही भाजपामध्ये प्रवेश केला.

हेही वाचा :
राज्यातील सर्व पुलांचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर