Jammu and Kashmir : लष्कराचे वाहन दरीत कोसळून पाच जवांनाचा मृत्यू

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : पूँछ जिल्ह्यात एलओलसीजवळ भारतीय लष्कराचे वाहन दरीत कोसळले.  त्यात पाच जवानांचा मृत्यू झाला. तर, दहा जवान गंभीर जखमी आहेत. (Jammu and Kashmir ) मंगळवारी (दि.२४) सायंकाळी ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार ११ मराठा लाईट इन्फंट्रीचे लष्करी वाहन नीलम मुख्यालयापासून नियंत्रण रेषेवरील बलनोई घोरा पोस्टकडे जात होते. यावेळी घोरा पोस्टजवळ अपघात झाला, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. (Jammu and Kashmir )

११ मराठा लाईट इन्फंट्रीचे लष्करी वाहन नीलम मुख्यालयापासून नियंत्रण रेषेवरील बलनोई घोरा पोस्टकडे जात होते. त्यावेळी घोरा पोस्टजवळ ते वाहन  अपघातग्रस्त झाले.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराचे वाहन सुमारे १५० फूट दरीत कोसळले. या घटनेत पाच जवानांचा मृत्यू झाला तर, चालकासह १० सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य करण्यासाठी ११ मराठा लाईट इन्फंट्रीची क्विक रिॲक्शन टीम (क्यूआरटी) आणि मानकोटे येथील पोलिस दल दाखल झाले. त्यांनी बचाव कार्य  सुरू केले आहे.

हेही वाचा :

Related posts

आयफेल टॉवरला आग

looteri dulhan : ‘लुटारू नवरी’चे श्रीमंतांवर जाळे

निवडणूक नियमांच्या बदलांवर काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव