Jaiswal’s half-century : भारत ३ बाद १४९ धावा, जैस्वालचे अर्धशतक

Jaiswal's half-century

मॅंचेस्टर : ओल्ड ट्रँफर्डवर सुरू असलेल्या भारत इंग्लंड चौथ्या कसोटी सामन्यात उपाहारापर्यंत पकड मिळवलेल्या भारतीय संघांने चहापानापर्यंत तीन खंदे फलंदाज गमावले. चहापानास खेळ थांबला तेव्हा भारताने तीन बाद १४९ धावा केल्या. सलामीवर यशस्वी जैस्वालने आपला फॉर्म राखताना अर्धशतक (५८) झळकावले. (Jaiswal’s half-century)

दुखापतीने ग्रस्त असलेल्या भारतीय संघात चौथ्या कसोटीपूर्वी भारतीय संघाने आपल्या अकरा खेळाडूंची यादी जाहीर केली. वेगवान गोलंदाजा शार्दुल ठाकूर संघात पुन्हा परतला असून अंशुल कांबोजला इंग्लंडविरुद्ध खेळण्याची संधी मिळणार आहे. नाणेफेक जिंकणाऱ्या इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने भारतीय संघाला फलंदाजीस पाचारण केले.

भरवश्याची जोडी यशस्वी जैस्वाल आणि के.एल. राहूल यांनी इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजीचा यशस्वीपणे मुकाबला केला. उसळता चेंडूंना त्यांनी व्यवस्थित तोंड दिली. ख्रिस वोक्स, जोफ्रा आर्चर, ब्रायडन कार्स, बेन स्टोक्सला त्यांनी व्यवस्थित खेळून काढले. उपाहाराला खेळ थांबला तेव्हा भारतीय संघांने बिनबाद ६४ धावा केल्या होत्या. (Jaiswal’s half-century)

उपहारानंतर खेळांवर इंग्लंडने चांगलीच पकड मिळवली. भारतीय संघाचे शतक सलामीवर जोडी फलकावर लावणार असे वाटत असताना ख्रिस वोक्सच्या आउटस्विंगरवर के.एल. राहूल चकला. स्लीपमध्ये हॅरी ब्रुकने त्याचा झेल टिपला. ९८ चेंडू खेळून राहूलने ४६ धावा केल्या. राहूल बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या १ बाद ९४ अशी होती. (Jaiswal’s half-century)

वेगवान गोलंदाजी थांबवून उजव्या हाताने गोलंदाजी करणाऱ्या फिरकी गोलंदाज लायम डॉसमला पाचारण केले. यशस्वी जैस्वालने अर्धशतक साजरे केले. पण डॉसनने त्याला फिरकीवर टिपले. डॉसनच्या गोलंदाजीवर त्याच्या बॅटच्या कड घेऊन स्लीपमध्ये झॅक क्रॉउलीच्या हातात चेंडू विसावला. १०७ धावा खेळताना यशस्वीने ५८ धावा केल्या.

सलामीची जोडी बाद झाल्यानंतर साई सुदर्शन आणि कर्णधार शुभमन गिल जोडी जमली असे वाटत असताना कर्णधार बेन स्टोक्सने कर्णधार गिलने त्याला बाद केले. चेंडू बाहेर जाणार असे समजून सोडण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू त्याच्या पॅडवर आदळला. इंग्लंडच्या खेळाडूंचे पायचितचे अपिल पंचांनी मान्य केले. कर्णधार गिलने मागितलेल्या रिव्हूमध्ये तो बाद झाल्याचे स्पष्ट झाले. एक बाद ९६ वरुन भारताची स्थिती ३ बाद १४० अशी झाली. ४६ धावांत भारताने तीन गडी गमावले. चहापानाला खेळ थांबला भारताच्या ३ बाद १४९ धावा जमवल्या. साई सुदर्शन २६ धावांवर तर उप कर्णधार ऋषभ पंत ३ धावांवर खेळत होते.

Related posts

वाहन चालकांना मराठी भाषेची सक्ती राहणारच :  प्रताप सरनाईक

बुलढाण्यात आमदार गायकवाड यांच्या घरासमोर पोलिस आणि आंदोलकांत झटापट

पंतप्रधान मोदींनी लुटला फुटबॉल खेळण्याचा आनंद