Chandgad counting : ‘चंदगड’ मधील ईव्हीएम, व्हीव्हीपॉटमधील मतमोजणी तंतोतंत जुळली

Chandgad counting

कोल्हापूर  : प्रतिनिधी : चंदगड विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएममधील मतदान आणि व्हीव्हीपॉटमधील मतमोजणी तंतोतंत जुळली. ईव्हीएम मेमरी, मायक्रोकंट्रोलरची तपासणी आणि पडताळणी ही प्रक्रिया झाली. ही प्रक्रिया २३ जुलै ते २६ जुलै या कालावधीत २७१ चंदगड विधानसभा मतदान केंद्र आणि २७६ कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ यांच्यासाठी घेण्यात येत आहे. (Chandgad counting)

आज बुधवारी पहिल्या दिवशी चंदगड विधानसभा मतदार संघातील केंद्र क्र. ३ कोवाडे, केंद्र क्र.५ निंगूडगे व केंद्र क्र.१०० खणदाळ या तीन ठिकाणच्या मतदान यंत्रांची मॉक पॉल घेण्यात आले. २७१ चंदगड विधानसभा मतदारसंघातील आमदार शिवाजी पाटील यांच्यातर्फे प्रतिनिधी म्हणून भारती जाधव तसेच उमेदवार नंदताई बाभूळकर- कुपेकर ( राष्ट्रवादी शदर चंद्र पवार गट) यांच्यातर्फे प्रतिनिधी म्हणून दिलीप पाटील तसेच अपक्ष उमेदवार संतोष चौगुले यांचे तर्फे मानसिंग देसाई हे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. (Chandgad counting)

सकाळी साडेआठ वाजता शासकीय ईव्हीएम गोदाम, राजाराम तलाव, सरनोबतवाडी रोड, कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे, उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ईव्हीएम स्ट्राँग रूम उघडण्यात आले. ज्यामध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चे ईव्हीएम मशीन्स ठेवण्यात आलेले होते.

त्यांनतर सकाळी १० वाजता मॉक पॉल प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. त्यामध्ये  केंद्र क्र.३ कोवाडे मतदान केंद्राला ७०७, केंद्र क्र.५ निंगूडगे मतदान केंद्राला ९०५ व केंद्र क्र.१०० खणदाळ मतदान केंद्राला ८१२ मतदान हे अर्जदार उमेदवाराच्या प्रतिनिधीमार्फत करण्यात आले.  त्यानंतर मॉक पॉल ची मतमोजणी व व्हीव्हीपैट मशिन्स मधील मतदान चिट्ठीची तपासणी केली असता दोन्हीची आकडेवारी तंतोतंत जुळली आहे. सर्व प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. (Chandgad counting)

या तपासणी व पडताळणी प्रक्रियेस उपजिल्हा निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी शक्ती कदम यांनी नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहिले. या प्रक्रियेस २७१ चंदगड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ काळबांडे, तहसीलदार ऋषिकेत शेळके, निवडणूक तहसीलदार महेश खिलारी आदी उपस्थितीत होते. सर्व ईव्हीएम तपासणी व पडताळणी प्रक्रिया सुरळीत पार पडली.

Related posts

अल्पसंख्याक मुलींच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उभारणीला गती द्या : सुनेत्रा  पवार 

मराठी सक्तीचीच या मुख्यमंत्र्यांच्या  घोषणेचे ‘म्यांव’ का झाले?;  संजय राऊतचा हल्लाबोल 

अजित पवारांच्या विमान अपघातानंतर ‘व्हीएसआर’ला १४५ कोटींचे वाटप