श्रीहरीकोटा : इस्त्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी झाले. आज रविवारी सकाळी उड्डाणानंतर तिसऱ्या टप्प्यात ६३ वा पीएसएलव्ही लाँच फेल गेला. तिसऱ्या चरणामध्ये अर्थ ऑब्जर्वेटरी सॅटेलाईन ईओएस- नाईन कक्षामध्ये स्थापित होत असताना दाब कमी झाल्याने हे उड्डाण अयशस्वी झाले. (Isro mission)
रविवारी सकाळी ५ वाजून ५९ श्रीहरिकोटामध्ये अर्थ ऑब्जर्व्हेशन सॅटेलाईनने अवकाशात झेप घेतली. पहिले आणि दुसरे चरण यशस्वी झाले पण तिसऱ्या चरणात सॅटेलाईट स्थिर न झाल्याने स्फोट झाला. त्यामुळे उपस्थित शास्त्रज्ञ निराश झाले. (Isro mission)
इस्त्रोचे यशस्वी पीएसएलव्ही रॉकेटवरुन ईओएस सॅटेलाईट आपल्या कक्षेत स्थिर होणार होता. पण तिसऱ्या टप्प्यात दाब राखण्यात यश न आल्याने हे मिशन अयशस्वी झाले. इस्त्रोचे प्रमुख नारायण यांनी सांगितले की “आज आम्ही श्रीहरिकोटा मधून १०१ सॅटेलाईटचे प्रक्षेपण केले. पीएसएलव्ही सी -६१ ईओएसएस-०९ मिशन चे लक्ष्य ठेवले होते. पीएसएलव्ही दुसरे टप्प्यात प्रदर्शन सामान्य होते. तिसऱ्या टप्प्यात मोटार पूर्ण क्षमतेने सुरू होती. पण याच टप्प्यात काही तांत्रिक अडचणी आल्याने मिशन पूर्ण होऊ शकले नाही. (Isro mission)
अयशस्वी लाँचिंगबद्दल नारायण म्हणाले, मोटारचा दाब आणि मोटार केसमध्ये चेंबरचे दबाव कमालीचा खाली घसरला आणि मिशन पूर्ण होऊ शकले नाही. या उड्डाणाचे आम्ही अभ्यास करत आहोत. आम्ही पुन्हा पूर्ण क्षमतेने मिशन पूर्ण करु. २०२२ मध्ये ईओएस-०९ लाँच केले होते. ईओएस-०४ सारखा हा एक रिपिट सॅटेलाईट आहे. त्याला रिमोट सेसिंग डेटा सुरक्षित करणे आणि अभ्यासात सुधारणा करण्यात मिशन उद्देश डिजाईन केले आहे. (Isro mission)