Irani Commander killed: इराणने दुसरा सर्वोच्च कमांडर गमावला

Irani Commander killed

तेल अवीव/तेहरान : इस्रायल आणि इराण दरम्यानच्या युद्धाचा भडका आणखी उडण्याची शक्यता आहे. इस्रायलने इराणचे चीफ ऑफ स्टाफ अली शादमानी यांना ठार केल्याचा दावा केला आहे. (Irani Commander killed)

इस्रायलच्या संरक्षण दलांनी (IDF) मध्य तेहरानवर केलेल्या लक्ष्यित हवाई हल्ल्यात इराणचे नवनियुक्त युद्धकाळातील चीफ ऑफ स्टाफ अली शादमानी यांना ठार केल्याची घोषणा केली आहे. आयडीएफने म्हटले आहे की रात्री अचानक मिळालेल्या संधीनंतर इस्रायली हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी एका कमांड सेंटरवर हल्ला केला. यात शादमानी यांचा मृत्यू झाला. इराणच्या लष्कराचा सर्वांत वरिष्ठ लष्करी कमांडर आणि इराणी सर्वोच्च नेते अली खामेनी यांचे निकटवर्ती, अशी त्यांची ओळख होती. (Irani Commander killed)

इस्रायली हल्ल्यात याआधी मारले गेलेले गुलाम अली रशीद यांच्या जागी शादमानी यांची नियुक्ती करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पदभार स्वीकारला होता. शादमानी यांनी इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) आणि इराणी सशस्त्र दलांचे नेतृत्व केले होते. त्यांचा मृत्यू इराणच्या लष्करी नेतृत्वासाठी एक मोठा धक्का आहे. त्यांच्या पूर्वसुरींच्या मृत्यूनंतर पाच दिवसांत ही दुसरी कारवाई आहे, असे आयडीएफने असे नमूद केले आहे.

इस्रायल आणि इराणमधील संघर्ष पाचव्या दिवशीही वाढत राहिला आणि त्यामुळे हा प्रदेश पूर्ण युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचला. रात्रभर या प्रदेशात क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचे आवाज अवकाशात ऐकू येत होते.

ट्रम्पनी अचानक सोडली जी ७

इस्रायलमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजत असताना आणि तेहरानवरील आकाशात स्फोट झाल्याने, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडामधील जी ७ शिखर परिषदेतील आपली उपस्थिती अर्धवट थांबवली आणि आपल्या नागरिकांना ‘‘ताबडतोब तेहरान सोडण्याचा’’ इशारा दिला. नंतर त्यांनी एअर फोर्स वनमधून पोस्ट केले की ‘‘इराणकडे अण्वस्त्र असू शकत नाही,’’ आणि ते देत असलेला प्रस्ताव नाकारल्याबद्दल त्यांनी इराणला पुन्हा एकदा दोषी धरले. (Irani Commander killed)

इराणकडून इस्रायलवर नव्याने क्षेपणास्त्र मारा इस्रायली संरक्षण दलांनी (आयडीएफ) मंगळवारी पहाटे इराणने इस्रायलवर आणखी एक क्षेपणास्त्रांचा मारा केल्याचे स्पष्ट केले. उत्तर इस्रायलमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजले आणि रहिवाशांना सुरक्षितस्थळी आश्रय घेण्याचे आदेश देण्यात आले. आयडीएफच्या संरक्षण यंत्रणांनी इराणची अनेक क्षेपणास्त्रे रोखली. दरम्यान, ‘‘आम्ही अमेरिकन हितांचे रक्षण करू,’’ असे व्हाईट हाऊसचे प्रवक्ते अ‍ॅलेक्स फीफर यांनी सांगितले. त्यांनी अमेरिकन सैन्य बचावात्मक स्थितीत असल्याचे पुष्टी केली. ताज्या हल्ल्यांमुळे झालेल्या जीवितहानी किंवा नुकसानीचे कोणतेही तत्काळ वृत्त नाही.

हेही वाचा :
इराण युद्धात अमेरिकेचा सहभाग?
 बॉम्ब हल्ल्यानंतर टीव्ही अँकर हिमतीने परतली

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

मृत्युदंडाच्या शिक्षा अपिलात का टिकत नाहीत?