अशियाई क्रीडा स्पर्धेत नीरू धांडाने रचला इतिहास

Niru Dhanda aims for gold at the Asian Games

नवी दिल्ली : जपानमधील नागोवा अशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ट्रॅप प्रकारात भारतीय नेमबाज नीरु धांडाने सुवर्णपदक पटकावत नवा इतिहास रचला. ट्रॅप प्रकारात वैयक्तित सुवर्णपदक पटकावणारी नीरू पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.

हरियाणाची २६ वर्षी नीरु पात्रता फेरीपासून आघाडीवर होती. अंतिम फेरीत तिने २८ गुण मिळवून तिने सुवर्णपदकांवर नाव कोरले. तसेच पूर्वीचा २४ गुणांचा अशियाई विक्रमही नीरू धांडाने मोडला. कतारच्या रे बासिलसोबत ११८ गुणांसह पात्रता फेरीत अव्वल स्थान पटकावल्यानंतर ती अंतिम फेरीत पोचली होती. अंतिम फेरीत तिने एकाग्रता दाखवत अचूक नेमबाजी करत सुवर्णपदकांवर नाव कोरले.

नीरु धांडाने याच स्पर्धेत महिलांच्या ट्रॅप सांघिक प्रकारात भारताला रौप्य पदक मिळाला. या संघातही नीरु होती. पण यापूर्वी कोणत्याही महिला खेळाडूंने ट्रॅप प्रकारात अशियाईस्पर्धेत पदक जिंकले नव्हते. १९७८ मध्ये रणधीर सिंग यांनी पुरुषांच्या वैयक्तिक ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर रोंजन सोधी याने २०१० च्या पुरुषांच्या डबल ट्रॅप प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदक पटकावले होते.

Related posts

ज्ञानेश कुमारांनी राजीनामा न दिल्यास पुन्हा जंतरमंतरवर जाणार :  अभिजीत दिपकें

उपमुख्यमंत्रीचे पुत्र म्हणून पार्थ पवाराना वेगळा न्याय मिळतोय का?

प्रॅक्टिस फुटबॉल क्लबच्या २०० खेळाडूंचा होणार गौरव