अॅथलेटिक्स मध्ये भारताने दिवस गाजवला; तीन रौप्य, तीन ब्राँझ

India wins 3 silver and 3 bronze medals each in athletics

नवी दिल्ली : जपान मधील नागोवा अशियाई क्रीडा स्पर्धेत अॅथलेटिक्स मध्ये भारताने दिवस चांगलाच गाजवला. नीरज चोप्राच्या गैरहजेरीत भारताच्या यशवीर सिंगने भालाफेकमध्ये रौप्य तर रोहित यादवने ब्राँझ पदक पटकावले. (India wins 3 silver and 3 bronze medals each in athletics)

भालाफेकमध्ये यशवीरला रौप्य, रोहितला ब्राँझ

श्रीलंकेच्या रुमेश पाथिरानेने सर्वोत्तम भालेकेक करत सुवर्ण पदक पटकावले. त्याने ८८.५५ मीटर भाला फेकला. त्याच्या खालोखाल यशवीरने ८५.७२ मीटर भाला फेकत रौप्य तर रोहित यादवने ८४.३५ मीटर भाला फेकत ब्राँझ पदकाची कमाई केली. भारताने भालाफेकमध्ये दोन पदक प्राप्त केली. पाकिस्तानचा अर्शद नदीम चौथ्या स्थानावर राहिला.

लांब उडीत मुरली शंकरने रौप्य पदक पटकावले

भारताच्या मुरली शंकरने लांब उडीत रौप्य पदक पटकावले. त्याने ८.०७ मीटर लांब उडी मारली. पण तिसऱ्या प्रयत्नात उडी मारताना त्याचा पाय दुखावला. त्यामुळे शेवटच्या दोन प्रयत्नातून त्याला माघार घ्यावी लागली. शेवटच्या दोन फेऱ्यात अन्य खेळाडूंना त्याचा दुसरा क्रमांक हिरावता न आल्याने शंकरचे रौप्य पदक निश्चित झाले. चीनच्या युहाओ शो ने सुवर्ण पदक पटकावले तर उझबेकीस्तानच्या अन्वर अन्वरोवने ब्राँझ पदक मिळवले.

पारुल चौधरीचे स्पर्धेतील दुसरे ब्राँझ पदक

पारुल चौधरीने आज दुसरे ब्राँझ पदक मिळवले. तिने ५००० मीटरची शर्यत १५ मिनटे १४.६१ सेकंदात पार करत तिसरे स्थान मिळवले. बहरीच्या विन्फ्रेड यावीने सुवर्ण तर जपानच्या नोझोमी तनाकाने रौप्य पदक मिळाले. यापूर्वी काल तिने महिलांच्या ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये ब्राँझ पदक मिळवले. (India wins 3 silver and 3 bronze medals each in athletics)

पी.टी.उषाचा विक्रम मोडित काढत विथ्या रामराजचे ब्राँझ

४०० मीटर अडथळा शर्यतीत विथ्या रामराजने ५४.७५ अशी वेळ देत ब्राँझ पदक पटकावले. तिने भारतीय सुवर्णकन्या पी.टी. उषा चा ४२ वर्षाच्या राष्ट्रीय विक्रमाची बरोबरी केली. आजच्या शर्यतीत तिची ५४.७५ सेकंदाचा उषाच्या नावावरचा विक्रम मोडला. तसेच लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये पी.टी. उषाने नोंदवलेला विक्रम ३९ वर्षापासून अबाधित होता. नागोवामध्ये रामराजने जुन्य राष्ट्रीय विक्रमात ६.६७ सेंकदाची कपात करत अशियाई स्पर्धेतील दुसरे पदक जिंकले. तिने मिश्र ४x४०० मीटर रिलेमध्ये शेवटच्या टप्प्यात जोरदार धाव घेत भारताला रौप्य पदक मिळवून दिले होते.

गुलवीर सिंंगचे रौप्य पदक पटकावले

भारताच्या गुलवीर सिंगने सोमवारी पुरुषांच्या १५०० मीटर शर्यतील सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी करत रौप्य पदक पटकावले. जपानमध्ये त्याचे दुसरे रौप्य आहे. १० हजार मीटर शर्यतीत त्याने रौप्य पदक पटकावले आहे. (India wins 3 silver and 3 bronze medals each in athletics)

Related posts

ज्ञानेश कुमारांनी राजीनामा न दिल्यास पुन्हा जंतरमंतरवर जाणार :  अभिजीत दिपकें

उपमुख्यमंत्रीचे पुत्र म्हणून पार्थ पवाराना वेगळा न्याय मिळतोय का?

प्रॅक्टिस फुटबॉल क्लबच्या २०० खेळाडूंचा होणार गौरव