बारा वर्षात मुश्रीफांनी फाईव्ह स्टार एमआयडीसीत एकही उद्योग आणला नाही : घाटगे

सेनापती कापशी; प्रतिनिधी : पालकमंत्री हसन मुश्रीफ पंचवीस वर्षे आमदार, बाबीस वर्षे मंत्री आहेत. एवढी वर्षे सत्ता असताना त्यांनी जाणीवपूर्वक मतदारसंघात उद्योगधंदे आणले नाहीत. कागल येथील फाईव्ह स्टार एमआयडीसीत गेल्या बारा वर्षात एकही मोठा उद्योग त्यांना आणता आला नाही, असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार समरजितसिंह घाटगे यांनी केले.

बाळेघोल (ता.कागल) येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. घाटगे पुढे म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पालकमंत्र्यांना युवकांचे भवितव्य घडविण्यासाठी व महिला सक्षमीकरणासाठी सर्वाधिक सत्ता दिली. मात्र, त्यांनी युवकांना बेरोजगार व व्यसनाधीन करून एक पिढी बरबाद केली. सात हजार कोटी रुपयांचा निधी आणला म्हणणाऱ्या मुश्रीफांनी महिला सक्षमीकरण, शाळा व आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीसाठी किती निधी आणला याचा महिलांनी विचार करावा.

पंचायत समितीचे माजी सभापती दत्तोपंत वालावलकर म्हणाले, स्वतःच्या स्वार्थासाठी समाजास वेठीस धरण्याचे काम सुरू आहे. भय आणि भ्रष्टाचार मुक्त समाज जीवनासाठी मुश्रीफांना पराभूत करणे आवश्यक आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफांच्या वाईट, चुकीच्या प्रवृत्तीचा नायनाट या निवडणुकीत त्यांना पराभूत करून करूया. आमिषाला बळी न पडता लोकशाहीचा खरा हिसका त्यांना दाखवूया.

शिवाजीराव कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक संतोष जाधव यांनी केले. सभेस शिवाजी कांबळे, मनजीत बेनाडीकर,दयानंद पाटील नंद्याळकर उपस्थित होते.‌ आभार दिनकर गुरव यांनी मानले.‌

मुश्रीफांना जनता कंटाळल्याने परिवर्तन अटळ

गेल्या पंचवीस वर्षांत होत असलेली दडपशाही, हुकुमशाहीला जनता कंटाळल्याने गावागावात परिवर्तनाचे वारे घोंघावत आहे. जनतेनेच निवडणूक हातात घेतल्याने या निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे. मुश्रीफांनी माणसांच्या विचारधारेला तिलांजली दिली. अशा नेतृत्वाला बदलण्याची वेळ आली आहे. पैसे पेरून तरुणाई व्यसनाधीन केले.पालकमंत्र्यांनी संपत्तीच्या धुंदीत अनेक घरं फोडली, असे प्रतिपादन सागर कोंडेकर यांनी केले

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी