कोल्हापूर : प्रतिनिधी : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पाच आरोपींना अटक करुन घरफोडीचे १२ गुन्हे उघडकीस आणले. संशयितांकडून १२६.५१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तर चांदीचे ७१८ ग्रॅम चांदीचे दागिने असा १२ लाखांचा माल हस्तगत केला. (House burglaries exposed)
कोल्हापूर पोलिसांनी यापूर्वीच सलीम महमंद शेख आणि त्यांच्या साथीदारांना अटक करुन ३२ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले होते. पण त्यांनी काही गुन्हे लपवून ठेवले होते. या गुन्ह्यातील आरोपी सलीम शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आणखीन घरफोडीचे गुन्हे केले असून चोरीतील दागिने त्याचा मित्र दस्तगीर मुल्ला जवाहरनगर, इचलकरंजी याच्या मध्यस्तीने सोनाराकडे विकले असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सलीम शेख, तौफिक शेख, यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी करवीर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आर.के.नगर, मोरेवाडी, कळंबा, वडगाव, आजरा, राधानगरीत घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. दस्तगीर मुल्ला यांच्या मध्यस्तीने चोरट्यांनी ऊर्वा आझाद महालकरी (रा. साळोखे पार्क) याकडे सोन्याचे चांदीचे दागिने दिले होते. चोरीचे दागिने फुलेवाडीतील संतोष मधुसुदन नार्वेकर यांच्याकडे दिल्याचे निष्पण झाले. पोलिसांनी १२ घरफोडीच गुन्हे उघडकीस आणले. (House burglaries exposed)
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेष मोरे, पोलिस अंमलदार अमोल कोळेकर, सुरेश पाटील, रामचंद्र कोळी, विनोद कांबळे, रुपेश माने, सागर चौगले, सागर माने, विजय इंगळे, महेश पाटील, महेश खोत, संजय देसाई, राजू येडगे, नवनाथ कदम, सुशील पाटील, राजेंद्र वरंडेकर, सतीश सूर्यवंशी यांनी तपास केला. (House burglaries exposed)