Heli Gubbi : इथोपिया हेली गुब्बी ज्वालामुखीतील राखेचा ढग भारतात घुसला

Heli Gubbi

नवी दिल्ली : इथोपियात हेली गुब्बी हा दहा हजार वर्षे  निद्रीस्त ज्वालामुखी जागा झाला असून या ज्वालामुखीतून लाखो टन राख बाहेर पडली आहे. ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या राखेच्या ढगांनी पश्चिम भारतात प्रवेश केला आहे.  गुजरात मार्गे राखेचे ढग राज्यस्थान, वायव्य महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा आणि पंजाबकडून पुढे सरकले आहेत. राखेचा प्रवास हिमालय आणि उत्तर प्रदेशाकडे सुरू आहे. या राखेचा हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता नसली तर राखेचे ढग उंचावरुन प्रवास करत असल्याने हवाई वाहतुकीत व्यतय येण्याची शक्यता आहे. सुरक्षित हवाई प्रवासासाठी विमान कंपन्या बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. (Heli Gubbi)

दहा हजार वर्षे सुप्त अवस्थेतीतील ज्वालामुखी अचानक जिवंत झाला आहे. धुराचा आणि राखेचा बॉम्ब अशी स्थानिकांनी या ज्वालामुखीचे वर्णन केले. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर जमीन थरथरली आणि आकाश काळे झाले. राखेचे मोठे लोट लाल समुद्रातून येमेन आणि ओमानकडे वाहू लागले आहेत. रविवारी पहाटे हेली गुब्बी ज्वालामुखी जिवंत झाला असून ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर १५ किलोमीटर उंचीपर्यंत राख पसरली. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर कोणतीही जिवितहानी झाली नसली पाळीव जनावरांना त्याचा फटका बसणार आहे. कारण गवताच्या कुरणावर राख पसरली आहे. त्यामुळे जनावरांना चरण्यासाठी पशुपालक आणि जनावरांना मोठा संघर्ष करावा लागणार आहे. जनावरांना खाण्यासाठी काहीच शिल्लक नसल्याचे स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे. (Heli Gubbi)

प्रत्यक्षदर्शींना अचानक बॉम्ब फुटल्यासारखा आवाज आला. प्रचंड मोठे आवाज झाला. गडगडाटाच्या गर्जनेने अनेकांना धक्का बसला. दारे आणि खिडक्या हादरवणाऱ्या जोरदार धक्क्याने अनेकजण जागे झाले.

दरम्यान राख उंच आकाशाकडे झेपावली असून त्याचे ढग तयार झाले आहेत. या ढगाचा प्रवास भारताकडे सुरू झाला असून गुजरातमार्गे काल सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान राखेचा ढग भारतात आला आहे.   दिल्ली एनसीआरमध्ये राखेचे ढग पसले असून तसे १५ हजार ते ४५० हजार फुटावर आहेत. राखेचे ढग खडक, काच आणि सल्फर डायऑक्साईडचे छोटे कण वाहून नेत आहेत. त्यामुळे आकाश अधिक गडद आणि धुसर दिसू शकते. पण त्याचा परिणाम दिल्लीवर पडण्याची शक्यता नसली तरी काही तज्ज्ञांच्या मते हवेच्या प्रदुषणात अचानक वाढ होऊ शकते अशी भिती व्यक्त केली जात आहे. (Heli Gubbi)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर