Heavy rain in Kokan : पावसाचा जोर वाढला….

Heavy rain in Kokan

कोल्हापूर : प्रतिनिधी : मान्सूनने आता वेग पकडला असून राज्यात कोकण किनापट्टीसह, मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. धरणक्षेत्रात जोरदार अतिवृष्टी होत आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून अनेक धरणांतील पाण्याचा विसर्ग वाढवल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. रायगड जिल्ह्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील घाटांवरील क्षेत्रात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. (Heavy rain in Kokan)

रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. पण रात्र भर कोसळणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. आठवड्याचा पाहिल्या दिवशी कामांवर जाणाऱ्या नोकरदारांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झ्घले आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी पार केली आहे. संगमेश्वर मधील शास्त्री नदीच्या पाणी झपाटयाने वाढल्याने संगमेश्वर तालुकयतील रामपेठ बाजारपेठ जलमर झाली आहे. गोळवली आमकरवाडी येथे भूस्खलानाची घटना घडली असून सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही. काल रविवारी संगमेश्वर आठवडा बाजारात पुराचे पाणी घुसले आहे. (Heavy rain in Kokan)

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. कसबा बावडा निगवे मार्गावरील राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे. जिल्ह्यातील सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. दुपारी बारा वाजता राजाराम बंधारा पाणी पातळी १७ फूट १० इंच इतकी होती. गेल्या चोवीस तासात गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. गगनबावडा तालुक्यात तब्बल १३५.७ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. चंदगड तालुक्यात ७४.६, आजरा तालुक्यात ६०.२, भुदरगड तालुक्यात ६३, कागल तालुक्यात ६४.३, राधानगरीत ६१.४, शाहूवाडीत ५१.६ पन्हाळ्यात ५४ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. (Heavy rain in Kokan)

जिल्ह्यातील सर्व धरणक्षेत्रात जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. चंदगड तालुक्यातील घटप्रभा धरणक्षत्रात तब्बल २२५ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. राधानगरी धरणक्षेत्रात १७२, तुळशी धरणक्षेत्रात १२४, दूधगंगा धरणक्षेत्रात १२०, कासारी धरण क्षेत्रात १४३, कुंभी धरण क्षेत्रात २०६, कोंदे १७० मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे.  

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर