मुंबई : प्रतिनिधी : मुंबई उच्च न्यायालयात दिशा सालियन मृत्यू प्रकरणांशी संबधित याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली. न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. न्यायमुर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठासमोस सुनावणी सुरू आहे. न्यायालय कोणता निर्णय देणार याकडे लक्ष लागले. या मृत्यू प्रकरणात आमदार अदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप झाले असल्याने या याचिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Hearing concluded in the Disha Salian death case)
दिशावर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. न्यायालयाने तपासातील अनेक बाबीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. उपलब्ध कागदपत्रांमधील काही बाबींची सखोल छाननी होणे आवश्यक असल्याचे मत न्यायालयाने नमूद केले आहे.
एका वडिलांनी आपली मुलगी गमावली आहे
या प्रकरणात राजकारण्यांविरुद्ध केलेल्या तक्रारीत आम्हाला रस नसून एका वडिलांनी आपली मुलगी गमावली आहे याच दृष्टीने आम्ही तपासांकडे बघतो आहे असे न्यायालयाने म्हटले आहे. सरकारी वकील शिशिर हिरे यांनी युक्तीवाद केला तर शिवसेना आमदार अमित ठाकरे यांच्याकडून सुदीप पासबोला यांनी युक्तीवाद केला आहे. माझ्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांनी ही याचिका दाखल करण्याचे प्रकरण घडवून आणले आहे. त्यामध्ये राणे आणि त्यांची मुले, राष्ट्रीय मीडीयामधील एक व्यक्ती आहे. पण ही याचिका टिकू शकत नाही. आम्हाला दिशाच्या वडिलांबद्दल पूर्ण सहानभुती आहे. त्यांना क्लोजर मिळाला पाहिजे या मताचे आम्हीही आहोत. पण याचिकेत ज्या काही मागण्या करण्यात आल्या आहेत. त्या टिकू शकत नाही. माझ्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांची ही खेळी असून ही याचिका तथ्थ्यांना धरुन नाही असेही युक्तीवाद अदित्य ठाकरेंचे वकील पासबोला यांनी केला. (Hearing concluded in the Disha Salian death case)
न्यायालयाने उपस्थित केलेले प्रश्न…
दिशा या १२ व्या मजल्यावरुन खाली पडल्याचे सांगितले जाते. पण त्यांच्या चेहऱ्यावर अत्यंत नाजूक भांगावर गंभीर फ्रॅक्चर नसताना दात फॅक्चर कसे झाले असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला आहे. जास्त उंचीवरुन पडूनही चेहऱ्याची इतर नाजूक हाडे कशी सुरक्षित राहिली?. दिशाच्या कपड्यांबाबत नोंदवण्यात आलेल्या माहितीमध्ये फरक आहे. जास्त उंचीवर एकादी व्यक्ती पडली असल्यास शरीराला झालेल्या दुखापतीमुळे कपड्यांवर रक्ताचे डाग किंवा खुणा आढळल्या नाही असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला आहे. (Hearing concluded in the Disha Salian death case)