HC questions appeal : तुम्ही साक्षीदार आहात का?; मालेगाव अपिलकर्त्यांना सवाल

HC questions appeal

मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालाविरोधात दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी उच्च न्यायालयात सुरू झाली आहे. अपीलकर्ते खटल्यात साक्षीदार असतील तरच याचिका विचारात घेण्यात येईल, असे मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी १६ सप्टेंबर रोजी स्पष्ट केले. तसेच त्यांनी (अपिलकर्त्यांनी) खटल्यादरम्यान साक्ष दिली का, असा प्रश्नही केला. (HC questions appeal)

२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडितांनी माजी भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि इतर आरोपींच्या निर्दोष सुटकेला याचिकांद्वारे आव्हान दिले आहे. या अपिलावर सुनावणी करताना, मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले की अपीलकर्ते खटल्यात साक्षीदार असतील तरच याचिका विचारात घेण्यात येईल. (HC questions appeal)

निसार अहमद सय्यद बिलाल यांच्यासह शेख लियाकत मोहिउद्दीन, शेख इशाक शेख युसूफ, उस्मान खान ऐनुल्ला खान, मुश्ताक शाह हारून शाह आणि शेख इब्राहिम शेख सुप्दो यांनी ॲड. अब्दुल मतीन शेख यांच्यामार्फत अपील दाखल केले आहे.

मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने असे नमूद केले की अपील दाखल करणारे अपीलकर्ते हे मुंबईपासून जवळजवळ २०० किमी अंतरावर असलेल्या मालेगाव शहराला हादरवून टाकणाऱ्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या किंवा जखमी झालेल्यांचे कुटुंबीय आहेत. (HC questions appeal)

‘‘तुमच्यापैकी कोणी खटल्यात साक्षीदार होता का? तुम्ही साक्षीदार आहात का ते आम्हाला दाखवा,’’ असे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर यांनी वकील शेख यांना विचारले.

मालेगाव बॉम्बस्फोट या खटल्याच्या निकालावेळी विशेष म्हणजे, विशेष न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष सोडले. त्यावेळी कोर्टाने म्हटले होते की, स्फोट घडवणारी बाईक प्रज्ञा ठाकूरांची आहे हे सिद्ध करण्यात सरकारी वकील अपयशी ठरले. स्फोटापूर्वी किमान २ वर्षे त्या ‘साध्वी’ बनल्या होत्या आणि त्यांनी ‘भौतिक जगाचा‘ त्याग केला होता. शिवाय, त्या किंवा इतर कोणत्याही आरोपीविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे सापडले नाहीत.

सह-आरोपी कर्नल पुरोहित यांच्या निवासस्थानी आरडीएक्स ठेवल्याबद्दल न्यायालयाने म्हटले होते की स्फोटके साठवल्याबद्दल कोणतेही पुरावे रेकॉर्डवर नाहीत. न्यायालयाने पुढे म्हटले आहे की प्रज्ञा ठाकूर आणि कर्नल पुरोहित यांनी स्थापन केलेल्या अभिनव भारत या संघटनेने दहशतवादी कारवायांसाठी आपल्या निधीचा वापर केल्याचा कोणताही पुरावा नाही.

२०१८ मध्ये खटला सुरू झाल्यानंतर १९ एप्रिल २०२५ रोजी या प्रकरणातील निकाल राखून ठेवण्यात आला होता. राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या या खटल्यांत भाजपच्या माजी खासदार ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांच्यासह सात आरोपी होते.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर